शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवेसाठी जमीन अधिग्रहण धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता

By admin | Updated: July 5, 2016 17:12 IST

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवे या अंदाजे ७१० किमी लांबीच्या अत्याधुनिक महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत धोरणाला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ५ : राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवे या अंदाजे ७१० किमी लांबीच्या अत्याधुनिक महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत धोरणाला मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. या ग्रीनफील्ड प्रकल्पाच्या निमित्ताने राज्यात प्रथमच लँड पूलिंग पद्धतीने जमीन अधिग्रहीत केली जाणार असून शेतकऱ्यांना या प्रकल्पात भागिदार करून घेतले जाणार असल्यामुळे जमीन अधिग्रहणाला विरोध होणार नाही, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.अंदाजे ३० हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग १० जिल्हे, २७ तालुके आणि ३५० गावांमधून जाणार आहे. याशिवाय हा महामार्ग कनेक्टरच्या माध्यमातून आणखी १४ जिल्हयांना जोडणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई अशा पाच विभागांना जोडणाऱ्या या प्रकल्पासाठी अंदाजे १० हजार हेक्टर जमीन लागणार असून या महामार्गाच्या बाजूने २४ स्मार्ट सिटीज उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी आणखी १२ हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे.राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी स्वीकारलेल्या लँड पूलिंग पद्धतीनुसार अधिग्रहीत केल्या जाणाऱ्या बागायती जमिनीसाठी वर्षाला एक लाख रुपये दिले जाणार असून जिरायती जमिनीसाठी ५० हजार रुपये मोबदला दिला जाणार आहे. त्यात प्रतिवर्षी १० टक्के वाढ होणार असून १० वर्षे हा मोबदला दिला जाईल. त्याचप्रमाणे, बागायती शेतकऱ्यांना ३० टक्के विकसित जमीन, तर जिरायती शेतकऱ्यांना २५ टक्के विकसित जमीन १० वर्षांनंतर दिली जाणार आहे. या विकसित जमिनीला शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही, तर भूसंपादन अधिनियम २०१३ नुसार जो मोबदला देय होईल, त्यावर १० वर्षांसाठी प्रतिवर्ष ९ टक्के व्याज या हिशेबाने जी रक्कम येईल, त्यानुसार सरकारने ती जमीन पुन्हा खरेदी करण्याची तरतूदही या प्रस्तावात आहे.महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या मुंबई-नागपूर कम्युनिकेशन हायवे पूर्ण करण्याची जबाबदारी मा.मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळावर सोपविली आहे. या खात्याचा मंत्री म्हणून मी त्यांचा आभारी आहे. महाराष्ट्राला समृद्धीच्या मार्गावर नेण्याचे काम हा महामार्ग करणार असल्यामुळे या महामार्गाचे नामकरणह्यमहाराष्ट्र समृद्धी महामार्गह्ण असे करण्यात येणार आहे. तसेच, महामार्गाच्या बाजूने ज्या स्मार्ट सिटीज उभारण्यात येणार आहेत, त्यांचा ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राला फायदा होणार असल्यामुळे या स्मार्ट सिटीजचे नामकरण ह्यकृषी समृद्धी केंद्रह्ण असे करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात भागिदार करून घेणारे हे धोरण आहे. शेतकऱ्यांना १० वर्षे खात्रीशीर उत्पन्न मिळेल. शिवाय १० वर्षांनंतर विकसित जमीनही परत मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध होणार नाही. या धोरणाला मंजुरी दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.