शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

उसाला बंदी !

By admin | Updated: September 1, 2015 00:59 IST

आॅगस्ट महिना संपल्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने यंदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई : आॅगस्ट महिना संपल्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने यंदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन सरकारने धरणातील पाणीसाठे पाण्यासाठी राखीव ठेवले आहेत. याउपरही परिस्थिती गंभीर बनली तर ऊस लागवड आणि गाळपावर निर्बंध आणले जाऊ शकतात, असे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.दुष्काळाचा फटका बसलेल्या भागात ८६ साखर कारखाने असून तेथे नव्याने साखर कारखाना सुरु करण्यास तसेच उसाचे क्षेत्र वाढविण्यास परवानगी देऊ नये, अशी सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या काही भागात पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य उभे राहिले आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रथम लोकांचे पिण्याचे पाणी, जनावरे व त्यानंतर शेती व औद्योगिक वापरासाठी पाणी देण्यास प्राधान्य दिले आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे समजत आहे उसाच्या शेतीला खूप पाणी लागत असल्याने त्याच्या लागवडीवर निर्बंध आणण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)