शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

सीए सीपीटी परीक्षेत प्रशस्ती लोहिया देशात दहावी

By admin | Updated: July 17, 2014 01:45 IST

अकोलाच्या शिरपेचात मानाचा तुरा

अकोला : सनदी लेखापाल (सीए) परीक्षेची पहिली पायरी असलेल्या समाईक नैपूण्य चाचणी (सीपीटी) परीक्षेत अकोल्याच्या प्रशस्ती लोहियाने देशातून दहावा क्रमांक प्राप्त केला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या निकालानुसार, सदर परीक्षेस बसलेल्या देशभरातील २ लाख विद्यार्थ्यांमधून प्रशस्तीने हे यश संपादन केले आहे. गतवर्षी सीएच्या अंतिम परीक्षेत, अकोला जिल्ह्यातील आकोट येथील गौरव श्रावगीने देशातून पहिला येण्याचा मान मिळविला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.प्रशस्ती येथील लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बारावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त केलेल्या प्रशस्तीला सीपीटी परीक्षेत कायदा या विषयात १00 टक्के गुण मिळाले आहेत. भविष्यात सनदी लेखापालाची पदवी मिळवून भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा प्रशस्तीचा मानस आहे. प्रशस्तीचे वडील प्रशांत लोहिया हे स्वत: अकोल्यातील नावाजलेले सनदी लेखापाल आहेत, तसेच तिची आईदेखील सनदी लेखापाल आहे.