शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ग. रा. कामत यांना जीवनगौरव पुरस्कार

By admin | Updated: April 20, 2015 02:41 IST

संगीत नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा, उद्योग, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत अलौकिक कामगिरी करून मोहोर उमटवणाऱ्या

मुंबई : संगीत नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा, उद्योग, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत अलौकिक कामगिरी करून मोहोर उमटवणाऱ्या व्यक्तींचा गौरव दूरदर्शनतर्फे केला जातो. दूरदर्शनचे महासंचालक मुकेश शर्मा, अभिनेता विक्रम गोखले, निवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल आणि आॅल इंडिया बिझनेस असोसिएशनचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी ‘सह्याद्री नवरत्न पुरस्कार’ जाहीर केले.यंदाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ग. रा. कामत यांना जाहीर झाला आहे. ‘स्वररत्न’ पुरस्काराने प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांना गौरविण्यात येईल. ‘रत्नदर्पण’ पुरस्कार सुरेश द्वादशीवार यांना प्रदान करण्यात येईल; तर जयंत सावरकर ‘नाट्यरत्न’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.यंदाचा ‘सह्याद्री साहित्यरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांना जाहीर झाला आहे; तर ‘रत्नशारदा’ पुरस्काराने डॉ. तारा भवाळकर यांना गौरविण्यात येईल. ‘चित्ररत्न’ पुरस्कार अभिनेता-दिग्दर्शक महेश कोठारे यांना जाहीर झाला आहे. वाहन उद्योगात विशेष ठसा उमटवणाऱ्या ‘भारत फोर्ज’ या पुण्यातील कंपनीचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांना ‘सह्याद्री रत्नवैभव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.शिल्पकार बी.आर. खेडकर यांना ‘कलारत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे; तर ‘रत्नसौरभ’ पुरस्कार जलतरणपटू वीरधवल खाडे यांना जाहीर झाला आहे. या वर्षीच्या नवरत्न पुरस्कार निवड समितीमध्ये मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त करुण श्रीवास्तव, निवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर आणि ज्येष्ठ उद्योजक विजय कलंत्री यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)