ई-महाभूमी प्रकल्प : तलाठय़ांना प्रशिक्षणसुरेंद्र राऊत - यवतमाळ जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराचा फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्याल्याचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा मनस्तापच वाट्याला येतो. मात्र आता ही प्रक्रिया अतिशय सहज होणार आहे. नोंदणी कार्यालयातील खरेदी विक्रीच्या व्यवहाराची प्रत थेट तलाठय़ाच्या लॅपटॉपवर दिसणार आहे. विशेष म्हणजे याचा एसएमएस संबधित तलाठय़ाला मिळणार आहे. त्यावरून खरेदीच्या व्यहाराची फेरफार केली जाणार आहे. त्यामुळे नमुना नऊची नोटीस बजाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. त्यासाठी ई- महाभुमी प्रकल्पातून तलाठय़ांना संगणकाचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. तहसील कार्यालय, भूमिअभिलेख आणि दुय्यम निबंधक कार्यालय आता ऑनलाईन एकमेकांशी जोडण्यात येत आहे. मालमत्तेशी संबधित कोणताही व्यवहार याच तीन कार्यालयामार्फत चालतो. आतापर्यंत नागरिकांना व्यवहारासाठी या कार्यालयामध्ये सातत्याने चकरा माराव्या लागत होत्या. प्रत्येक गोष्ट स्वत:ला करावी लागत होती. यातुनच भष्ट्राचाराला खतपाणी मिळत आहे. ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी संपूर्ण व्यवहारच ऑनलाईन करण्यात येत आहे. तलाठी दफ्तराचे संगणकीकरण, अभिलेखे कक्षाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. १ ऑगस्टपासून १५ दिवसाच्या आत फेरफार घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे जमिनीच्या व्यवहारात निर्माण झालेल्या दलाल वर्गालाही चाप बसणार आहे. सध्या एक प्लॉट परस्पर विकला जातो. प्रत्यक्ष या व्यवहाराची नोंद होत नाही. याला ऑनलाईन फेरफारमुळे र्मयादा येणार आहे. किमान एक प्लॉट किती व्यक्तींना विकला हे दिसणार आहे. महसूल आणि जमाबंदी विभागामध्ये १९३0 नंतर प्रथम एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सुधारणा केली जात आहे. ई- महाभूमी प्रकल्पात ई-चावडी, ई-फेरफार, जमीन मोजणी कार्यालयाचे संगणकीकरण, ई- अभिलेख यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. ही संपूर्ण बदल घडवूण आणण्यासाठी जिल्हा सूचना विज्ञान कार्यालयाची यंत्रणा राबत आहे. सर्वच सातबार्यांची डाटा एंट्री करण्यात आली आहे.
आता खरेदी अन् तत्काळ फेरफार
By admin | Updated: June 5, 2014 00:59 IST