शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गोवंडी येथे व्यवसायिकाला लुटले

By admin | Updated: May 14, 2014 01:31 IST

रिक्षातून घरी जात असलेल्या बाळासाहेब बेडकाळे या व्यवसायिकाला चाकूचा धाक दाखवत लुटण्याची घटना सोमवारी रात्री गोवंडी परिसरात घडली.

मुंबई: रिक्षातून घरी जात असलेल्या बाळासाहेब बेडकाळे या व्यवसायिकाला चाकूचा धाक दाखवत लुटण्याची घटना सोमवारी रात्री गोवंडी परिसरात घडली. देवनार पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक करुन लुटलेले सोने हस्तगत केले आहे. चेंबूरच्या घाटलेगाव परिसतात राहणारे बेडकाळे सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गोवंडीवरुन चेंबूरच्या दिशेने येत होते. दरम्यान येथील वामन तुकाराम पाटील मार्गावर राहूल रोहिरे (२७) हा आरोपी अचानक त्यांच्या रिक्षासमोर आल्याने रिक्षाचालकाने ब्रेक दाबून रिक्षा थांबवली. मात्र रिक्षा थांबताच त्यांनी पाठीमागे बसलेल्या बेडकाळे यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील ८७ हजार रूपये किमतीची तीन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. बेकाळे यांनी रिक्षामधून उतरुन आरोपीचा पाठलाग केला. मात्र तो पळून गेला. त्यामुळे त्यांनी आज सकाळी पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता तो लुटारु गोवंडीच्या निबोंणी बाग परिसरात राहात असल्याची माहिती एका रहिवाशाने त्यांना दिली. त्यानुसार त्यांनी देवनार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ एक पथक त्या परिसरात पाठवून आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीकडून पोलिसांनी सोनसाखळी हस्तगत केली आहे. मात्र त्यामधील लॉकेट एका दुकानदाराला विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.