शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा आजपासून ‘बंद’

By admin | Updated: July 11, 2016 01:26 IST

फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनने येत्या सोमवारपासून (दि. ११) बेमुदत संप पुकारला आहे

पुणे : फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनने येत्या सोमवारपासून (दि. ११) बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल मार्केट यार्डाबाहेर विकावा लागणार आहे. परंतु, शेतकरी स्वत: शेतीमाल विक्रीसाठी मार्केट यार्डात असल्यास त्यांना विरोध केला जाणार नाही, अशी भूमिका अडते असोसिएशनने घेतली आहे.शासनाच्या या निर्णयाचा फटका गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांना बसणार असून या निर्णयाने बाजार आवाराबाहेरील व्यापाऱ्यांना सेस, अडत आणि इतर खर्चातून सूट देण्यात आली आहे. मात्र, मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना सेस, अडत, तोलाई, मापाई भरावीच लागणार आहे. शासनाचे हे धोरण व्यापारीविरोधी असल्याने रविवारी मार्केट यार्डातील शारदा गणपती मंदिर येथे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनच्या व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.अडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले म्हणाले, की शासनाने घेतलेला निर्णय शेतकरीविरोधी असून त्याचा फटका बाजारातील सर्व घटकांना बसणार आहे. शासनाचे नवीन धोरण तकलादू असून अधिक काळ चालणारे नाही. पूर्वापार चालत आलेली शेतीमाल विक्रीची परंपरा अचानक बदलता येणार नाही. ज्यांना कायद्यातील बदल नको आहे, असे शेतकरी आपला शेतीमाल बाजारात आणणारच नाहीत. ज्यांच्या नावावर सात/बारा आहे, अशा शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यास आमचा विरोध राहणार नाही. मार्केट यार्डात एक हजारांहून अधिक गाळे असून अनेक व्यापाऱ्यांनी आपली मालमत्ता गहाण ठेवून हे गाळे विकत घेतले आहेत. नवीन कायद्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, असे नमूद करून भोसले म्हणाले, की मार्केट यार्डाच्या भिंतीच्या आत शेतीमाल विक्रीसाठी कडक नियमावली आणि या भिंतीच्या बाहेर विक्री करण्यासाठी कोणत्याही अटी नाहीत. हे शासनाचे धोरण अन्यायकारक आणि चुकीचे आहे. सध्या सर्व व्यवहार इमानदारीने सुरू असून नवीन धोरणामुळे तो बेईमानीत सुरू होतील.बाजार सुरूच राहणार : दिलीप खैरे व्यापाऱ्यांनी बंद पुकारला असला तरीही सोमवारी बाजार सुरूच राहणार असून बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्ड येथे शेतकऱ्यांचा माल खरेदी-विक्री करण्यासाठी फळे, भाजीपाला विभागात एकूण १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना शेतकरी संघटना आणि भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. बाजार समितीचे सर्व पदाधिकारी आणि सचिव सोमवारी येथे उपस्थित राहणार आहेत, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे सांगितले. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपला शेतीमाल मार्केट यार्ड येथे विक्रीस आणावा, असे आवाहन त्यांनी केले.