शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या बसची वाहनांना धडक

By admin | Updated: November 4, 2016 01:01 IST

जीजी इंटरनॅशनल स्कुल बसने पादचाऱ्यासह अन्य वाहनांना धडक दिली.

पिंपरी : जीजी इंटरनॅशनल स्कुल बसने पादचाऱ्यासह अन्य वाहनांना धडक दिली. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास साई गार्डन चौकात हा अपघात झाला. पायी जात असलेला गजेंद्र प्रभुलाल जैन (वय २४, रा़ तिरूपती सोसायटी, महात्मा फु लेनगर, चिंचवड) हा युवक जखमी झाला, तर मोटार आणि चार दुचाकींचे नुकसान झाले आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसचालक संदीप दगडू वडवालेकर (वय ४८, रा़ साईनाथ पार्क, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे़ दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्याचा गुरूवारी पहिलाच दिवस होता. बसमध्ये जीजी इंटरनॅशनल स्कूलचे सात विद्यार्थी होते़ शाळेतील विद्यार्थी घरी सोडविण्यासाठी बस जात असताना साई गार्डन चौकात आल्यावर रस्त्याने पायी जात असलेल्या जैन यांना बसचालकाने धडक दिली़ त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले़ चालकाने बस तशीच पुढे नेल्याने अपघातात एक मोटार आणि चार दुचाकींचे नुकसान झाले आहे़ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार बसचालकाला फिट आल्यामुळे अपघात घडला़ पोलिसांनी बसचालकाकडे चौकशी केली असता आपल्याला काही आठवत नसल्याचे त्याने सांगितले़ >या प्रकरणी शाळेतील वाहतूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा भारती भागवानी यांनी लोकमतशी बोलताना बसचालकाला चक्कर आल्यामुळे अपघात घडला, असे स्पष्टीकरण दिले. अपघातात कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. बसचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला चक्कर कशामुळे आली? हे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.