शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बस आणि कारचा अपघात, 6 प्रवाशी जखमी

By admin | Updated: January 19, 2017 20:50 IST

भरधाव वेगाने जाणारी एसटीबस व कार समोरा समोर धडकली या अपघातात कारमधील 6 प्रवाशी जखमी

ऑनलाइन लोकमत

सिल्लोड, दि.19 - सिल्लोड जवळ संभाजी राजे चौक़ातील वळणावर जळगाव औरंगाबाद रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारी एसटीबस व कार समोरा समोर धडकली या अपघातात कारमधील 6 प्रवाशी जखमी झाले असून कारमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारी 3 वाजता झाला.या अपघातात कार चालक व मालक माधव रामराव गुटे वय 50 , पत्नी ललीता माधवराव गुटे वय 45 दोघे रा औरंगाबाद  यांची प्रकृति चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.या अपघातात  जखमी झालेल्या प्रवाश्या ची नावे अशी कृष्ना माधवराव गुटे वय 18, प्राजक्ता माधवराव गुटे वय 20, रश्मि माधवराव गुटे वय 28,व सुजिता माधवराव गुटे सर्व रा.जयभारती नगर औरंगाबाद अशी आहे.

औरंगाबाद येथील रहिवाशी असलेले गुटे पारिवार हे सैलानी येथे दर्शन घेऊन  औरंगाबाद कडे जात असतांना सिल्लोड शहरा जवळ  त्यांच्या टाटा विस्टा कार क्र. एम एच 20 सीएस 7312 ला भरधाव वेगाने येणाऱ्या सिल्लोड आगाराची एसटी बस क्र.एमएच 12 एक्यू 8812 ने  जोराची धडक दिल्याने कार मधील 6 प्रवाशी जखमी झाले.एकाच परिवारातील सहा जन जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कांतिलाल पाटिल,सपोनी शकील शेख,पो. ना. टारपे,पो.कॉ. कोरडे हे घटनास्थळी दाखल झाले.व अपघातातील जखमींना उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.जखमींना प्राथमिक उपचार करुण घरी पाठविण्यात आले.पुढील तपास हे पोलिस निरीक्षक कांतिलाल पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शकील शेख हे करीत आहे.

कारचा चक्काचुर.......सदरील अपघात एवढा भयंकर होता की कारचा चक्काचुर झाला सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. बस मधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

धोकादायक वळण........राजे संभाजी चौक हे सिल्लोड बायपास रस्त्यावर असून येथे धोकादायक वळण आहे. वसि या वळणावरच  हा अपघात झाला. सिल्लोड शहरात जाणारा रस्ता व हायवे यात वाहन चालकांना रस्ताच कळत नाही या वळणावर रेडियम, दिशादर्शक फलक,  नाही यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होतात याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

आठ दिवसात तीसरा अपघातएसटी महामंडल बसचा एका आठवडयातील हा तीसरा अपघात असून या तिन्ही अपघातात आता पर्यन्त 25 प्रवाशी जखमी झाले आहे. मागील आठवड्यात शहराजवळील म्हशांनभुमी जवळ ट्रक बस अपघातात तीन जन जखमी झाले होते. तर दुसरा अपघात हा शहरातील आझाद चौक येथे बस ट्रक वर जाऊन धड़कल्याने यात तब्बल सोळा जन जखमी  झाले होते.  व गुरुवार झालेल्या बस - कार अपघातात कार मधील सहा जण जखमी झाले .(फोटो)