शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये बसचा अपघात, 9 ठार

By admin | Updated: June 11, 2017 12:03 IST

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या धानो-यात एका बसचा अपघात होऊन नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

ऑनलाइन लोकमत

बीड, दि.11 - मुंबईहून बीडकडे येणारी खासगी बस पलटल्याने नऊ ठार आणि 26 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील धानोरा घाटात घडली. जखमींना अहमदनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील विलास जोगदंड या चिमुकल्याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागलेला आहे. त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.अपघाताची माहिती समजताच बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना अहमदनगर रुग्णालयात हलविले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अहमदनगरमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले. चालकाने मद्यप्राशन केले होते का? की त्याला झोप लागली, याचा शोध घेतला जाईल. तर या अपघातात  रशीद अब्दुल रज्जाक कुरेशी (६० रा.बाराभाई गल्ली अंबाजोगाई जि.बीड), आतिक खान मुनवर (३२ रा.हो.जवळा ता.केज जि.बीड), मेहरून निसा आमिन पटेल (३५ रा.मुंबई), आसिमा नजीम सय्यद (४५ मुंबई), सर्जेराव लक्ष्मण पवार (३० वाटीवाडा तांडा ता.धारूर जि.बीड), योगेश गौतम टकले (३० चिखली ता.आष्टी जि.बीड), पठाण बहादुर पठाण इस्माईल (६५ रा.बसवेश्वर जि.लातूर), सुनील मल्हारी कुंभारकर (४५ रा.कर्वेनगर, पुणे), चांद पाशा ताजोद्दीन पठाण (६६ रा.नेकनुर, ता.बीड) आदींचा मृत्यू झाला आहे. तर रमाकांत चंद्रकांत केदारी (३० पुणे), प्रियंका अंगद जोगदंड (२३), अंगद शिवाजी जोगदंड (२६), सोनाली संतोष जोगदंड (१२), विलास अंगद जोगदंड (४ सर्व रा.दैठणा ता.अंबाजोगाई जि.बीड), आशा चांद सय्यद (४५ रा. नेकनूर) वंदना विजय सुर्यवंशी (२६), स्वप्नाली विजय सुर्यवंशी (सर्व रा.गौर ता. निलंगा जि.लातूर),  बाळासाहेब खाडे (४० देवळाली पानाची ता.आष्टी), तबसून मुज्जमील कुरेशी (२५), मुद्दसीर मुज्जमील कुरेशी (६, रा.अंबाजोगाई), उमेश ब्रम्हदास चव्हाण (२१ रा.अकोला जि.वाशिम),  बाबा गोरक्ष सरवदे (२७ रा.भुसुंदरगा जि.लातूर), शांताबाई ज्ञानोबा जाधव (५०), सुकन्या अशोक जाधव (२५) अथर्व अशोक जाधव (४), अनुष्का अशोक जाधव (१० सर्व रा. मुंंबई), मुस्कान आमिन पटेल (१२), मोहमद हसन पटेल (६ दोघेही रा. मुंबई), विजय राघवण (१८ तमिळनाडू), मोहन व्यंकट वाघमारे (४७), मिना मोहन वाघमारे (३४), शुभम मोहन वाघमारे (१६), चैतन्य मोहन वाघमारे (१० सर्व रा.नळेगाव ता.चाकुर जि.लातूर), सलिम चांद सय्यद (२३ रा.कल्याण), पंकज अंबादास घोडके (४५ रा.चिंचोलीमाळी ता.केज) अशी जखमींची नावे आहेत.