शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

By admin | Updated: September 10, 2016 05:01 IST

रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना पार्कसाईट पोलिसांनी गुरुवारी रात्री बेड्या ठोकल्या.

मुंबई : रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना पार्कसाईट पोलिसांनी गुरुवारी रात्री बेड्या ठोकल्या. अर्जुनसिंग राजपूत (२४), मोहनसिंग राजपूत (२६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, न्यायालयाने आरोपींना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांचा साथीदार रुपेश सिंग आणि धर्मेशकुमार पटेल यांचा राजस्थान आणि गुजरातमध्ये शोध सुरू असल्याचे पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>राजस्थान आणि गुजरात राज्यातून आलेल्या लुटारूंची एक टोळी रात्रीच्या वेळी गाड्यांचा वापर करून घरफोड्या करीत आहे. या टोळीने मुख्यत्वेकरून मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांना लक्ष्य केल्याची माहिती विक्रोळीच्या पार्कसाईट पोलिसांना मिळाली होती. याचा तपास करीत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आर. डी. जाधव यांनी सापळा रचून राजपूत बंधूंना पकडले. त्यांच्या जवळून घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.