शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दारूभट्टीवर धाड; १४ लाखांचा माल जप्त

By admin | Updated: June 9, 2017 03:21 IST

गावठी दारूभट्टीच्या अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी धाड टाकून तब्बल ९१ हजार लीटर रसायनासह १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठी देसाई गावामध्ये गावठी दारूभट्टीच्या अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी धाड टाकून तब्बल ९१ हजार लीटर रसायनासह १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे (घटक क्रमांक १) पोलीस निरीक्षक रणवीर बयेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी येथील अड्ड्यांवर धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेले. गावठी दारू तयार करण्याचे साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले. प्रत्येकी २०० लीटर क्षमतेचे ६०० प्लास्टिकचे ड्रम, प्रत्येक ड्रममध्ये सुमारे १५० लीटर याप्रमाणे एकूण ९१ हजार ५०० लीटर नवसागर, गूळमिश्रित कच्चे रसायन पोलिसांनी हस्तगत केले. याशिवाय, प्रत्येकी ४० लीटर याप्रमाणे १६०० लीटर तयार गावठी दारूने भरलेले ४० प्लास्टिक कॅन, प्रत्येकी ५०० लीटर क्षमतेचे ६ पायांचे ढोल, अ‍ॅल्युमिनिअमचे २ सतेले, २ लाकडी चाटू असा एकूण १४ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पळून गेलेल्या आरोपींबाबत पोलिसांनी माहिती घेतली असता त्यांची नावे मुकुंद केणी, विक्रम केणी, रूपेश केशव म्हात्रे, पंढरी म्हात्रे, नितेश म्हात्रे आणि राकेश बळीराम म्हात्रे अशी असल्याचे समजले.