शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बंगला एक,हक्क अनेक

By admin | Updated: November 20, 2014 01:07 IST

उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला नागपूरमधील ‘देवगिरी’ बंगला यंदाही हिवाळी अधिवेशनापूर्वी चर्चेत आहे. विद्यमान मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद नसल्याने तो मिळावा म्हणून काही

‘देवगिरी’: उपमुख्यमंत्री नसल्याने ज्येष्ठतेला प्राधान्यनागपूर: उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला नागपूरमधील ‘देवगिरी’ बंगला यंदाही हिवाळी अधिवेशनापूर्वी चर्चेत आहे. विद्यमान मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद नसल्याने तो मिळावा म्हणून काही ज्येष्ठ मंत्र्यांनी दावेदारी पुढे केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री नसेल तर ज्येष्ठतेच्या आधारावर या बंगल्याचे वाटप केले जाते. मात्र अंतिम निर्णय यासंदर्भातील समिती घेते.उपमुख्यमंत्रिपद ही युती-आघाडातील राजकीय सोयीसाठी निर्माण केलेले पद आहे. त्याला कॅबिनेटचाच दर्जा असतो. मात्र सोयीच्या राजकारणात या पदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्र्यानंतर महत्त्वाचे पद मानले जाते. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसाठी ‘रामगिरी’ तर उपमुख्यमंत्र्यासाठी ‘देवगिरी’ हे शासकीय बंगले राखीव आहेत. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नाही. त्यामुळे देवगिरीवर मुक्काम कुणाचा याबाबत चर्चा आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ सदस्यांची हा बंगला मिळावा, अशी इच्छा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री नसेल तर अनुभवातील ज्येष्ठतेच्या प्राधान्यानुसार त्याचे वाटप केले जाते. या निकषात एकनाथ खडसे बसतात. त्यांच्याकडे गृहखात्यानंतरचे दुसरे महत्त्वाचे महसूल खाते आहे. मंत्रिमंडळातील त्यांचे आजचे स्थानही दुसऱ्या क्रमांकाचेच आहे. त्यामुळे त्यांचा मुक्काम देवगिरीवर राहू शकतो. खडसेनंतर सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांची नावे आहेत. युतीच्या काळात मुनगंटीवार मंत्री होते आताही त्यांच्याकडे महत्त्वाचे अर्थ खाते आहे. तावडे प्रथमच मंत्री झाले आहे.युतीच्या काळात उपमुख्यमंत्रिपद भाजपकडे होते.आघाडी सरकारच्या काळात ते राष्ट्रवादीकडे आले. आता युती आणि आघाडीशिवाय राज्यात प्रथमच भाजप सत्तेत आला आहे. मात्र उपमुख्यमंत्री नसल्याने ‘देवगिरी’वर कोण राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. (प्रतिनिधी)