शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भंगाळेला अखेर बेड्या

By admin | Updated: April 1, 2017 04:22 IST

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संभाषण झाल्याचा दावा करणे

मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संभाषण झाल्याचा दावा करणे हॅकर मनीष भंगाळेला महागात पडले आहे. तपासात त्याने इंटरनेटचा गैरवापर करून बनावट ई-मेल आणि खोटी बिले सादर करून खडसे यांची बदनामी केल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी त्याला सायबर पोलिसांनी अटक केली. त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.मूळचा जळगाव व सध्या बडोदा येथील रहिवासी मनीष लीलाधर भंगाळे याने काही दिवसांपूर्वी कथितरीत्या पाकिस्तानच्या दूरसंचार खात्याचे (पीटीसीएल) सर्व्हर हॅक करून दाऊद इब्राहिमच्या कराचीतल्या क्लिफ्टन या आलिशान परिसरात असणाऱ्या बंगल्यातून जगभरात करण्यात आलेल्या कॉल्सच्या माहितीचे वर्गीकरण केले. या बंगल्यात दाऊदच्या पत्नीच्या नावे चार दूरध्वनी कनेक्शन आहेत. त्यात ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या कालखंडात भारतासह जगातील काही देशांमधल्या विशिष्ट मोबाइल क्रमांकावर कॉल करण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा दावा मनीष भंगाळे याने केला आहे. त्यापैकी एक नंबर खडसेंचा असल्याचा आरोप त्याने केला होता. आपच्या प्रीती मेनन यांनीही हे आरोप करत खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र खडसेंनी हे आरोप फेटाळले होते. मनीष भंगाळेचा बोलविता धनी जळगावचा - खडसेहॅकर मनीष भंगाळे याचा बोलविता धनी जळगाव जिल्ह्यातील राजकीय व्यक्ती आहे, असा गौप्यस्फोट बोदवड येथे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओ स्टेटमेंट भंगाळेच्या पत्नीसह आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. हॅकर मनीषने केवळ साथीदारासोबत बदनामी करण्यासाठी ठाणे येथील इंटरनेटचा गैरवापर करून बदनामी केली. वेळ पडल्यास त्याच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)सर्व आरोप खोटेअखेर तपासात भंगाळेने केलेले आरोप खोटे असल्याचे समोर आले. इंटरनेटचा गैरवापर करून खडसे यांची बदनामी करण्याच्या हेतूने बनावट इमेल तसेच खोटी टेलिफोन बिले प्रसिद्ध केली. प्राथमिक तपासात भंगाळेचा यात सहभाग समोर आला. त्याच्याविरुद्ध कलम ४६८,४७१सह ६६ ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली.