शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाधनांचे विनापरवाना उत्पादन करणाऱ्यांना दणका

By admin | Updated: January 13, 2017 04:48 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाने भुलेश्वर आणि काळबादेवी परिसरातील विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने भुलेश्वर आणि काळबादेवी परिसरातील विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकला आहे. यात लोरिअल, लॅक्मे, फेअर अ‍ॅण्ड लव्हली, ओले, रेव्हलॉन, एल18, निविया यांसारख्या नामांकित ब्रँडची तब्बल २ कोटी ३९ लाख २ हजार ६४० रुपयांची बनावट उत्पादने एफडीएने जप्त केली आहेत. या उपलब्ध साठ्यातून सौंदर्य प्रसाधनांचे नमुने चाचणी व विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.अन्न व औषध प्रशासन विभागाला मुंबईत बनावट सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या आदेशान्वये सहआयुक्त विनीता थॉमस, पी.पी. म्हानवर आणि जे.बी. मंत्री यांनी तीन पथकांसह काळबादेवी आणि भुलेश्वर येथील कारखान्यांवर छापा टाकला. काळबादेवीच्या सारंग स्ट्रीट येथील कारखान्यात मोहम्मद खातीब शेख मोहम्मद जारिफ शेख हा विनापरवाना नामांकित ब्रँड्सची बनावट उत्पादने करत असल्याचे आढळले. कारवाईदरम्यान पथकाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसाधने पॅकिंग केलेली आढळली. तसेच, सौंदर्य प्रसाधने बनविण्याची यंत्रेही पकडण्यात आली. मोहम्मद खातीब शेखची चौकशी केली असता या बनावट सौंदर्य प्रसाधनांकरिता कच्चा माल, पॅकिंग मटेरिअल कृष्णा कॉस्मेटिक्सचे प्रवीण ढिल्ला पुरवित असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय, या उत्पादनांची विक्री-वितरण ढिल्ला करत असल्याचे आढळून आले. या माहितीनंतर एफडीएच्या पथकाने भुलेश्वर येथील कृष्णा कॉस्मेटिक्सची तपासणी केली. यात प्रवीण ढिल्ला हे विविध नामांकित कंपन्यांच्या नावे उत्पादित केलेला सौंदर्य प्रसाधनांचा साठा आणि चायना मेक इम्पोर्टेड कॉस्मेटिक्स विनाबिलाने खरेदी करून विक्री करीत असल्याचे आढळले. कृष्णा कॉस्मेटिक्समधून २ कोटी ३८ लाख ९० हजार ६४० रुपयांची उत्पादने जप्त केली. या प्रकरणी, प्रवीण ढिल्ला याच्या चौकशीनंतर भुलेश्वर येथील राधे कॉस्मेटिक्सचीही तपासणी करण्यात आली. या तपासात विविध नामांकित कंपन्यांच्या नावे उत्पादित केलेला सौंदर्य प्रसाधनांचा साठा विनाबिलाने विक्री करीत असल्याचे आढळले. राधे कॉस्मेटिक्समधून १ लाख २२ हजार रुपयांची उत्पादने जप्त केली. (प्रतिनिधी)गुन्हा दाखलया प्रकरणी संबंधितांना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत नोटीस पाठविली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणी संबंधित कंपन्यांकडे अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचे एफडीएने सांगितले. कारवाईदरम्यान साठा जप्त करण्यात अधिकाऱ्यांना बुधवारी रात्री अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ही कारवाई गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती. त्या वेळी पोलिसांचे संरक्षण घेऊन साठा जप्त करून एफडीए मुख्यालयात आणण्यात आला.