शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

को.रे.ला ग्राहक मंचचा दणका

By admin | Updated: July 1, 2014 02:07 IST

जागा आरक्षित केली असतानाही आरक्षित डब्यात बिगर आरक्षित प्रवाशांचे लोंढे आल्याने वास्को ते नाशिकर्पयतचा प्रवास मोठय़ा मुश्कीलीने करावा

मडगाव : जागा आरक्षित केली असतानाही आरक्षित डब्यात बिगर आरक्षित प्रवाशांचे लोंढे आल्याने वास्को ते नाशिकर्पयतचा प्रवास मोठय़ा मुश्कीलीने करावा लागलेल्या चिखली वास्को येथील सुरेश कामत या 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने त्यांना सोसाव्या लागलेल्या प्रवासासाठी व झालेल्या मनस्तापासाठी  कोकण रेल्वेने 6 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी व  दाव्याची रक्कम म्हणून आणखी दोन हजार रुपये देण्याचा आदेश राज्य ग्राहक मंचचे अध्यक्ष नेल्सन ब्रिटो व विद्या गुरव यांनी दिला.
नोव्हेंबर 2012 मध्ये वास्कोहून  नाशिकला जाणा:या सुरेश कामत  व त्यांच्या पत्नीला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. वास्को-पाटणा एक्स्प्रेसच्या स्लीपर क्लासची दोन तिकिटे त्यानी आरक्षित केली होती. रेल्वे मडगावात आल्यावर बिनआरक्षित  प्रवासी गाडीत चढल़े गर्दीमुळे नाशिकला पोहचेर्पयत  सुरेश कामत टॉयलेटलाही जाऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्याबाबत कामत यांनी दक्षिण गोवा ग्राहक मंचसमोर आपला दावा दाखल करुन रेल्वे बोर्डाला प्रतिवादी करुन तिकीटाचे पैसे, जेवणाचा खर्च तसेच इतर प्रवासाचा खर्च असे एकंदर 6 हजार 331 रुपयांची नुकसान भरपाई  देण्याची मागणी केली़ दक्षिण गोवा मंचचे अध्यक्ष जयंत प्रभू व त्यांच्या मंडळाने ही मागणी मान्य करताना  कामत यांना ही रक्कम देण्याबरोबरच दाव्याचा खर्च म्हणून आणखी दहा हजार रुपये दय़ावेत असा आदेश दिला होता. या आदेशाला कोंकण रेल्वेतर्फे राज्य आयोगासमोर आव्हान देण्यात आले होते.
आयोगाने त्यांच्या आदेशात कामत यांना 6 हजारची नुकसान भरपाई व दोन हजार रुपये दाव्याच्या खर्चापोटी देण्यास सांगितले आह़े 3क् दिवसात ही रक्कम दिली नाही तर त्यावर 9 टक्के व्याज द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. आवश्यक वाटल्याल कोंकण रेल्वेने ही रक्कम  कामात हलगर्जीपणा दाखविलेल्या टीसीकडून वसूल करावी, असेही सूचित करण्यात आले आहे.  (प्रतिनिधी)