शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राला बंपर बूस्ट; एफएसआय वाढीसह तीन मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 07:00 IST

म्हाडा पुनर्विकासात तीन एफएसआय, सीबीडीत देणार पाच एफएसआय. मुंबईत म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी तीन एफएसआय होता. राज्यासाठी तो अडीच होता. आता तो संपूर्ण राज्यासाठी तीन करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गृहनिर्माण क्षेत्राला बंपर बूस्ट देताना नगरविकास विभागाने महत्त्वाचे तीन निर्णय घेतले आहेत. गृहनिर्माण योजनांमधील सुविधा क्षेत्राची (अ‍ॅमिनिटी स्पेस) कमी करण्यात आली आहे. म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी ३ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिला जाईल. कमर्शियल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे सीबीडीत पाच एफएसआय दिला जाणार आहे. 

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे निर्णय घेतले. नगरविकास मंत्रालयाने एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत (युनिफाइड डीसीपीआर) आणखी सुधारणा करून नियमावली अधिक सुटसुटीत केली. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळून अर्थव्यवस्थेला गती मिळेल.मुंबईत म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी तीन एफएसआय होता. राज्यासाठी तो अडीच होता. आता तो संपूर्ण राज्यासाठी तीन करण्यात आला. गृहनिर्माण योजनेच्या ठिकाणी विविध सुविधा पुरविण्यासाठी विशिष्ट जागा सोडावी लागते. त्यासाठी १०% जागा सोडणे बंधनकारक होते. आता ५ टक्केच जागा सोडावी लागेल. कमर्शियल बिझनेस डिस्ट्रिक्ट क्षेत्रात उंच इमारतींच्या उभारणीची परवानगी दिली जाते. तेथे आता पाच एफएसआय दिला जाईल. वाढीव एफएसआयसाठी रेडीरेकनर दराच्या ५० टक्के इतका प्रीमियम भरावा लागेल. प्रधान सचिव भूषण गगराणी व त्यांच्या टीमने चर्चा करून या सुधारणा सुचवल्या. त्यांना शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

आजच्या तिन्ही निर्णयांमुळे गृहनिर्माण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युनिफाइड डीसीपीआरमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हे निर्णय घेण्यात आले.    - एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

टॅग्स :mhadaम्हाडा