शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बी’च्या घरात शिरला ‘बुलेट’ फॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 05:39 IST

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी रविवारी शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटासारखाच काहीसा प्रसंग घडला.

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी रविवारी शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटासारखाच काहीसा प्रसंग घडला. गाणी ऐकविण्याचे कारण सांगत, एक तरुण जुहूतील अमिताभ यांच्या ‘जलसा’ या बंगल्यात शिरला. सुरक्षारक्षकांनी वेळीच प्रसंगावधान राखून त्याला पकडले. या तरुणाला अटक करण्यात आली आहे. बुलेट बलिंदर यादव (२३) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा आहे. पुण्याच्या नेहरूनगर परिसरात एका कन्स्ट्रक्शन साइटवर तो काम करतो. जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास यादव हा अमिताभ यांच्या ‘जलसा’ या बंगल्यात सुरक्षारक्षकांची नजर चुकवत शिरला. रविवारी या बंगल्यासमोर बिग बींना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्याची गर्दी असते. याचाच फायदा घेत, तो जलसाच्या भिंतीवर चढून बंगल्यात घुसला. मुख्य म्हणजे, त्यावेळी बिग बी हे बंगल्यातच होते. मात्र, ही बाब वेळीच सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी याची सूचना जुहू पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी यादवला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. आपण बच्चन यांचे फॅन असून, त्यांना माझ्या भोजपुरी गीतरचना दाखविण्यासाठी आल्याचे अटक केलेल्या तरुणाने पोलिसांना सांगितले. यादवला रविवारी अटक करण्यात आली असून, त्याला सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याचे जुहूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोसाळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्याचे वडील मुलुंड परिसरात राहतात. मात्र, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे जामिनासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)>‘जलसा’च्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हअमिताभ यांच्या घरात अनोळखी व्यक्तीने शिरण्याची ही पहिली वेळ नाही. २०१२ मध्येदेखील स्वत:ला फॅन म्हणवणारा एक इसम ‘जलसा’मध्ये अशाच प्रकारे शिरला होता, ज्याने बिग बी यांच्या बेडरूमपर्यंत मजल मारत काही मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती. मात्र, जुहू पोलिसांनी इंदूरमधून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.