शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनसाठी ८ हजार कोटी, महाराष्ट्राचा आर्थिक वाटा, १ लाख ८ हजार कोटींचा एकूण प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 05:02 IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी होणार असलेला खर्च आणि त्यात महाराष्ट्राने उचलावयाचा आर्थिक भार याची वेगवेगळी आकडेवारी समोर येत असली तरी राज्याचा वाटा ८ हजार कोटी रुपयांचाच असेल, असे आज सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आले.

विशेष प्रतिनिधीमुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी होणार असलेला खर्च आणि त्यात महाराष्ट्राने उचलावयाचा आर्थिक भार याची वेगवेगळी आकडेवारी समोर येत असली तरी राज्याचा वाटा ८ हजार कोटी रुपयांचाच असेल, असे आज सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आले.१ लाख ८ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. त्यातील ७८ हजार कोटींचे कर्ज जपान इंटरनॅशनल कोआॅपरेशन एजन्सीकडून मिळणार असून त्याची परतफेड केंद्र शासन करणार आहे.उर्वरित ३० हजार कोटी रुपयांपैकी प्रत्येकी ८ हजार कोटी रुपये महाराष्ट्र आणि गुजरात सरकार देईल आणि उर्वरित निधी हा रेल्वे मंत्रालय देणार आहे, अशी माहिती बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन या प्रकल्पाची उभारणी करणार आहे. राज्याला ८ हजार कोटी रुपये हे २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने द्यावा लागतील.या प्रकल्पासाठी प्रारंभिक भागभांडवल म्हणून ५०० कोटी रुपयांचा जो निधी दिला जाणार आहे त्यातील प्रत्येकी १२५ कोटी रुपयांचा भार महाराष्ट्र व गुजरात सरकार उचलेल अन्य निधी रेल्वे मंत्रालय देणार आहे.१५ आॅगस्ट २०२२ रोजी बुलेट ट्रेन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. ते भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असेल.खासगी कंपन्याही चालवू शकतील ट्रेनमुंबई-अहमदाबाद मार्गावर खासगी कंपन्यांना बुलेट ट्रेन चालविण्याची परवानगी देण्यात येणार आहे. स्टेशन आणि रेल्वेमार्गाच्या वापरासाठीचे शुल्क त्यांच्याकडून आकारले जाईल.नागपूरच्या बुलेटट्रेनचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडेमुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्यासंदर्भात आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे काम स्पेनच्या एका कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने नुकताच त्यांचा अहवाल रेल्वे मंत्रालयास सादर केला आहे. या प्रकल्पास केंद्र सरकारने लवकर मान्यता द्यावी, यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन