शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात खासदार कार्यालयासमोर स्फोट!

By admin | Updated: February 4, 2017 02:53 IST

संशयास्पद वस्तुला तोंड लावणार्‍या कुत्र्याच्या उडाल्या चिंधड्या

बुलडाणा, दि. 0३- खासदार प्रतापराव जाधव यांच्या जिजामाता क्रीडा संकुलातील कार्यालयासमोर शुक्रवारी रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान स्फोट झाला. एका संशयास्पद स्फोटक वस्तुला तोंड लावण्याचा प्रयत्न करणार्‍या कुत्र्याच्या या खळबळजनक घटनेत चिंधड्या उडाल्या. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू आहे. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे येथील जिजामाता क्रीडा संकुलात कार्यालय आहे. कार्यालय बंद असताना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास कार्यालयासमोर बेवारस पडून असलेल्या एका वस्तुला कुत्र्याने तोंड लावले. कुत्र्याने तोंड लावताच त्या वस्तुचा स्फोट झाला व कुत्र्याच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला. परिसरातील व्यावसायिकांनी तेथे धाव घेतली. या स्फोटात कुत्रा ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिराही त्याच ठिकाणी स्फोट झाल्याची चर्चा आजच्या घटनेनंतर उपस्थितांमध्ये होती. तथापि, गुरुवारच्या घटनेला मात्र अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले असून, तपास करीत आहेत.सीसी कॅमेर्‍याची पाहणीखासदार जाधव यांच्या कार्यालय परिसरात असलेल्या दुकानांसमोरील सीसी कॅमेर्‍याची तपासणी पोलीस करीत आहेत. . - माझ्या कार्यालयासमोर स्फोट झाल्याची माहिती मिळाली. हा स्फोट कशाचा झाला. त्या ठिकाणी स्फोटक वस्तू कुणी ठेवली. ती वस्तू कोणती होती, याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही केली आहे. ती वस्तू कुणी ठेवली की त्या ठिकाणी कशी आली, याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा.खा. प्रतापराव जाधव ,बुलडाणा घटनास्थळावर डॉग युनीट आणले व तपासणी केली. मात्र या ठिकाणी संशयास्पद काहीच आढळले नाही. कुत्र्याचे शव शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल. प्रथमदर्शनी टवाळखोरांचा खोडसाळपणा असल्याचे निदर्शनास येत आहे.- अंबादास हिवाळे , ठाणेदार बुलडाणा.