शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गावांतील बांधकामेही नियमित

By admin | Updated: March 23, 2016 04:10 IST

शहरी भागातील अनधिकृत बांधकाने नियमित करण्याचे धोरण आणल्यानंतर आता राज्य सरकार ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या विचारात आहे.

मुंबई : शहरी भागातील अनधिकृत बांधकाने नियमित करण्याचे धोरण आणल्यानंतर आता राज्य सरकार ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या विचारात आहे. या संबंधीचे धोरण लवकरच आणले जाणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. महसूल विभागाच्या मालकीच्या जागा लीजवर घेऊन त्यावर गृहनिर्माण प्रकल्प उभारलेल्या गृहनिर्माण संस्थांना आता संबंधित जमिनीची मालकी दिली जाईल. त्यासाठी रेडीरेकनरनुसार किंवा शासन ठरवून देईल, त्या दरानुसार गृहनिर्माण संस्थांकडून शुल्क आकारले जाईल. या संबंधीचे विधेयक लवकरच सादर केले जाईल, असेही खडसे यांनी सांगितले. गृहनिर्माण संस्थांना लीजवर दिलेल्या जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ही बांधकामे आता पाडणे शक्य नाही. लीजचे नूतनीकरण करावेच लागते. मात्र, संबंधित जमिनीबाबत कोणत्याही परवानगीसाठी गृहनिर्माण संस्थांना राज्य सरकारकडे यावे लागते. यावर उपाय म्हणून संबंधित निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातही काही जागा या विशिष्ट कामासाठी आरक्षित ठेवलेल्या असतात. त्यावरील बांधकामे नियमित करता येणार नाहीत. मात्र, आरक्षणे नसतील, अशा जागांवरही रेडीरेकनर दराने रक्कम भरून घेऊन बांधकामे नियमित करून घेण्याचे धोरण आखले जाईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बालाजी किणीकर, रूपेश म्हात्रे आदींनी लक्षवेधी सूचना मांडत अंबरनाथ येथील सूर्योदय गृहनिर्माण सोसायटीत खरेदी, विक्री आणि हस्तांतरण व्यवहार गेल्या १२ वर्षांपासून बंंद असल्याकडे महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर खडसे यांनी सांगितले की, ‘सूर्योदय गृहनिर्माण सोसायटीला निवासी प्रयोजनासाठी काही अटी व शर्तींवर जागा देण्यात आली आहे. सदर संस्थेच्या काही सदस्यांनी शासनाची पूर्व परवानगी न घेता, त्यांची निवासी बांधकामे काढून त्यावर बहुमजली इमारतीचे बांधकाम केले व त्यातील सदनिकांची विक्री करून काही दुकाने, मंगल कार्यालये, बँका असा वाणिज्यिक वापर सुरू केला. नियमांचा भंग केल्यास बाजारमूल्याच्या ७५ टक्के रक्कम आकारून नियमानुकूल करता येते. पण यासाठी नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)