शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

समर्पणाला शिल्पात बांधणे आव्हानच होते

By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST

ऊन, वारा, पाणी अशा कुठल्याही ऋतूच्या अतिरेकाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या वृत्तपत्र विके्रत्याच्या समर्पणाला शिल्पात साकारणे तसे आव्हानच होते़

शिल्पकार किरण अदाते यांची भावनानागपूर : ऊन, वारा, पाणी अशा कुठल्याही ऋतूच्या अतिरेकाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या वृत्तपत्र विके्रत्याच्या समर्पणाला शिल्पात साकारणे तसे आव्हानच होते़ परंतु या आव्हानानेच मला बळ दिले आणि माझ्या हातून ही सुंदर आणि ऐतिहासिक कलाकृती साकारली गेली, अशा शब्दात वृत्तपत्र विक्रेत्या बंधूच्या शिल्पकृतीचे शिल्पकार किरण अदाते यांनी आपली भावना व्यक्त केली़ अदाते हे तसे मूळचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथचे़ आता मुंबईत राहतात़ दहाव्या वर्गापर्यंतचे शिक्षण गावातच झाले़ शिक्षणाच्या या प्रवासातच शिल्पकलेची आवड निर्माण झाली व दहावीनंतर लगेच त्यांनी मुंबईच्या जे़ जे़ स्कूल आॅफ आर्ट येथे फाऊंडेशन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला़ २००६ साली मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत आयोजित एक मान्सून शोमध्ये त्यांची लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन खा़ विजय दर्डा यांच्याशी ओळख झाली व त्यांची कला बघून विजयबाबू यांनी त्यांना स्टॅचू आॅफ फ्रीडम आॅफ प्रेसची संकल्पना सांगितली़ अदाते यांनाही ती आवडली आणि आज त्यांची ही सुरेख कलाकृती लोकमतच्या बुटीबोरी येथील प्रिटिंग युनिटची शान ठरली आहे़ या नंतर विजयबाबूंच्या मनात वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांच्या गौरवाचा विचार आला व त्यांनी अदाते यांना विक्रेत्या बांधवांचे शिल्प साकारण्याबाबत विचारले़ अदाते यांनी लगेच होकार दिला़ परंतु अगदी तांत्रिक पद्धतीने काम न करता आधी त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांचा संघर्ष समजून घेतला व नंतर शिल्प बांधणीला सुरुवात केली़ (प्रतिनिधी)स्टेनलेस स्टील व कॉपरचा वापरहे संपूर्ण शिल्प वेगळे व ऐतिहासिक बनविण्यासाठी अदाते यांनी स्टेनलेस स्टील व कॉपरचा वापर केला़ सायकल पूर्णपणे स्टेनलेस स्टीलची व त्यावरील पुतळा कॉपरचा, असे हे सुंदर कॉम्बिनेशन आहे़ बुटीबोरी येथील ‘स्टॅचू आॅफ फ्रीडम आॅफ प्रेस’मध्ये वृत्तपत्राच्या मजकुरासाठी अदाते यांनी कॉपर वापरला होता़ त्याच मजकुरासारखे कॉपर त्यांनी या शिल्पाला वापरले आहे ज्यामुळे शिल्पाची श्रीमंती आणखी वाढली आहे़ हे संपूर्ण शिल्प बनवायला त्यांना चार महिन्यांचा अवधी लागला़ विजयबाबू हे खरे कलेचे चाहतेविजयबाबू हे खरे कलेचे चाहते आहेत़ त्यांनी कलेवर आणि कलाकारांवर नेहमी प्रेम केले व संधीही उपलब्ध करून दिली़ माझ्या हातून हे जे ऐतिहासिक शिल्प साकारले गेले त्याचे श्रेयही विजयबाबूंना जाते़ त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो़