शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

इमारतींचे मंजूर आराखडेही येतात ‘आरटीआय’ कक्षेत

By admin | Updated: November 1, 2015 01:16 IST

शहरात खासगी जमिनीवर बांधण्यात येत असलेल्या इमारतींचे आराखडे महापालिकेने मंजूर केल्यानंतर, ते ‘पब्लिक डॉक्युमेंट’ होत असल्याने नागरिकांनी असे आराखडे व तदनुषंगिक माहिती

मुंबई : शहरात खासगी जमिनीवर बांधण्यात येत असलेल्या इमारतींचे आराखडे महापालिकेने मंजूर केल्यानंतर, ते ‘पब्लिक डॉक्युमेंट’ होत असल्याने नागरिकांनी असे आराखडे व तदनुषंगिक माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागितल्यास, महापालिका त्यास नकार देऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.एखाद्या प्रकरणात माहिती मागणारा व संबंधित बांधकाम करणारा यांच्यात त्याच बांधकामावरून न्यायालयात स्वतंत्रपणे वाद सुरू असला, तरी अर्जदार खासगी हेतूने माहिती मागत आहे, असे म्हणून पालिका माहिती देण्याचे टाळू शकत नाही. मागितलेल्या माहितीचा अर्जदारास खासगी कामासाठी उपयोग होऊ शकणार असेल, तरी त्या माहितीचे स्वरूप सार्वजनिक असल्याने ‘आरटीआय’नुसार ती देणे भाग आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.माहिती मागणारा व बांधकाम करणारा हे एकाच धंद्यातील प्रतिस्पर्धी असले, तरी महापालिकेने अशी माहिती ‘आरटीआय’खाली दिल्याने धंद्याची गुपिते उघड केल्यासारखे होत नाही, तसेच आर्किटेक्टने तयार केलेले आराखडे महापालिकेने एकदा मंजूर केले की, त्याची प्रत ‘आरटीआय’खाली अन्य कोणाला दिल्याने कॉपीराइटचाही भंग होत नाही, असे न्यायालयाने म्हटले.सार्वजनिक संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणणे हा ‘आरटीआय’ कायद्याचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे माहिती मागणाऱ्याचा व तिच्या संभाव्य वापराचा हेतू, संभाव्य प्रतिस्पर्धा किंवा कॉपीराइट अशा मुद्द्यांवर माहिती नाकारली गेली, तर कायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल, असेही न्यायालयाने नमूद केले.सुप्रसिद्ध उद्योगपती नस्ली नेविल वाडिया हे दिवंगत ई.एफ. दिनशॉ यांच्या मालमत्तेचे एकमेव प्रशासकही आहेत. या मालमत्तेपैकी मालाड (प.) येथील काही जमीन विकसित करण्यासाठी वाडिया यांनी मालमत्तेचे प्रशासक या नात्याने फेरानी हॉटेल्स कंपनीशी १९९५ मध्ये करार-मदार केले व त्यांना कुलमुखत्यारपत्रही दिले. नंतर दोघांमध्ये वाद झाल्याने २००८ मध्ये वाडिया यांनी केलेले करार रद्द करून फेरानी हॉटेल्सविरुद्ध उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. तो अद्याप प्रलंबित आहे.या पार्श्वभूमीवर वाडिया यांनी महापालिकेच्या माहिती अधिकाऱ्याकडे अर्ज करून आपण ज्या जमिनीसंबंधी फेरानी हॉटेल्स यांच्याशी करार केला होता, त्या जमिनीवर करायच्या बांधकामांचे त्यांनी सादर केलेले व मंजूर झालेले आराखडे, ले-आऊट व सब डिव्हिजन फ्लॅन इत्यादी माहिती मागितली. त्यांनी व नंतर अपिलीय अधिकाऱ्याने माहिती देण्यास नकार दिल्याने, वाडिया यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपिल केले व तेथे त्यांच्या बाजूने निकाल झाला होता. (विशेष प्रतिनिधी)माहिती आयोगाच्या निकालाविरोधात होती याचिकामे. फेरानी हॉटेल्स प्रा. लि. या कंपनीने केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. एम. एस. शंकळेशा व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. राज्य माहिती आयोगाने यंदाच्या ३१ जानेवारी रोजी दिलेल्या निकालाविरुद्ध ही याचिका केली गेली होती.