शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

बिल्डरांचे ‘नगरविकास’ला साकडे

By admin | Updated: March 2, 2017 03:49 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ‘ओपन लॅण्ड’ आणि वाणिज्य जागांसाठी आकारला जाणारा कर हा इतर महापालिकांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे.

मुरलीधर भवार,कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ‘ओपन लॅण्ड’ आणि वाणिज्य जागांसाठी आकारला जाणारा कर हा इतर महापालिकांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. त्यामुळे हा कर कमी करून त्याची योग्य आकारणी करावी, या मागणीसाठी ‘एमसीएचआय’ या बिल्डर संघटनेने बुधवारी नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेतली. त्यावर, म्हैसकर यांनी याप्रकरणी महापालिकेने ३१ मार्चच्या आत ठराव करून पाठवावा, असे आदेश आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहेत, अशी माहिती ‘एमसीएचआय’ने दिली. ‘एमसीएचआय’च्या शिष्टमंडळात अध्यक्ष प्रफुल्ल शहा, पदाधिकारी श्रीकांत शितोळे, दीपक मेहता, रवी पाटील आणि राजेश गुप्ता, तर महापालिकेचे आयुक्त रवींद्रन व अतिरिक्त आयुक्त संजय घरत उपस्थित होते. राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी सगळ्यात जास्त करआकारणी करते. ‘ओपन लॅण्ड’ला ठाणे महापालिका दर चौरस मीटरला ८० रुपये कर आकारते, तर केडीएमसी १४०० रुपये कर आकारते. ‘एमसीएचआय’च्या मते ही करआकारणी जिझिया करासारखी आहे. त्यामुळे ती रद्द करावी. केडीएमसीने ओपन लॅण्ड व वाणिज्यसाठी भांडवली मूल्याप्रमाणे करआकारणी करावी, असा ठराव ३ मार्च २०१४ रोजी मंजूर केला आहे. महासभेने हा ठराव मंजूर करूनही महापालिका प्रशासनकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. याप्रकरणी ‘एमसीएचआय’ने सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु, अजूनही त्यांच्या सूचनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यानंतर, १५ दिवसांपूर्वी पुन्हा बिल्डरांनी रवींद्रन यांची भेट घेतली. त्यावेळी बिल्डरांना केवळ आश्वासन देण्यात आले. त्यावेळी बिल्डरांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र, बिल्डर संघटनेने म्हैसकर यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांना असलेल्या अधिकारात ते यासंदर्भातील निर्णय घेऊ शकतात. अन्यथा, पुन्हा नव्याने ठराव करून तो मंजूर करू शकतात. त्यानंतर तो नगरविकासकडे पाठवावा. यासंदर्भातील कार्यवाही ३१ मार्चच्या आत करावी, असे म्हैसकर यांनी स्पष्ट केल्याचे संघटनने सांगितले.यापूर्वी तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी स्टेअर केस प्रीमिअमचा कर १०० टक्क्यावरून ४० टक्के कमी केला होता. हा करही इतर महापालिकेच्या तुलनेत जास्तीचा होता. हा निर्णय आयुक्तांना असलेल्या अधिकारात सोनवणे यांनी घेतला होता. त्यावेळी मनसेने त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर, स्वत: राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आयुक्तांचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर वाद संपला होता. हा संदर्भ असल्याने आताचे आयुक्त निर्णय घेण्यास कचरत असल्याचे स्पष्ट होत आहे. स्टेअर केस प्रीमियमचा निर्णय घेतल्यावर बिल्डरांनी शहरांसाठी १०० कोटींची गुंतवणूक करून विकासकामांत हातभार लावण्याचे आश्वासन दिले होते. एजन्सीमार्फत शहर विकासासाठी २१ हजार कोटींचा आराखडाही सादर केला होता. मात्र, त्याचे पुढे काही झाले नाही. >आर्थिक फटका बसणार ओपन लॅण्डचा कर कमी केल्यास महापालिकेच्या तिजोरीला आर्थिक तोटा सहन करावा लागेल. थकबाकीपोटी जवळपास १०० कोटी रुपयांचा कर अपेक्षित आहे. चालू मागणीनुसार किमान २२ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. कर कमी केल्यास या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल, या भीतीपोटी प्रशासनाकडून कर कमी करण्याचा निर्णय घेतला जात नसल्याचे बोलले जात आहे.