शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या मेट्रोविरोधामागे ‘बिल्डरप्रेम’

By admin | Updated: June 10, 2016 08:04 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानच्या मेट्रो-३ प्रकल्पाला शिवसेनेने केलेला विरोध हा केवळ बिल्डरांचे हित जपण्यासाठी आहे.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानच्या मेट्रो-३ प्रकल्पाला शिवसेनेने केलेला विरोध हा केवळ बिल्डरांचे हित जपण्यासाठी आहे. समूह विकासाच्या माध्यमातून मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना दुप्पट क्षेत्रफळाचे घर देण्याची सरकारची भूमिका आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे आधीच पुर्नविकासाचे करार केलेल्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. या बिल्डरांचे हित जपण्यासाठीच शिवसेनेने मेट्रो-३ला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे, अशी टीका भाजपाने केली. मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांनी गुरुवारी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. मेट्रो रेल कार्पोरेशनला महापालिकेचे १७ भूखंड देण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. मुळात मेट्रोने हे भूखंड लीजवर मागितले आहेत. भूखंडांची मालकी महापालिकेकडेच राहणार असून त्यासाठीच्या तब्बल ३७ अटीही कार्पोरेशनने मान्य केल्या आहेत. मेट्रोने मालकीचा आग्रह धरलेला नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले. मेट्रोमुळे कुलाबा, गिरगाव भागातील मराठी माणूस विस्थापित होणार असल्याची शिवसेनेची ओरड चुकीची आहे. मेट्रोमुळे कोणीच विस्थापित होणार नाही. प्रकल्पबाधितांना त्याच ठिकाणी घरे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उलट प्रकल्पबाधितांना दुप्पट आकाराचे घर मिळणार आहे. त्याबाबतचा आराखडाही राज्य सरकारने मागील महिन्यात महापालिकेकडे पाठविला आहे. मात्र, पुर्नवसनाच्या राज्य सरकारच्या योजनेमुळे खासगी बिल्डरांची अडचण झाली आहे, असे मत आरोप शेलार यांनी मांडले. (प्रतिनिधी)>महत्त्वाची ठिकाणे जोडली जाणार मेट्रो-३ मुळे मुंबादेवीपासून हाजीअली, सिद्धीविनायक ते अंधेरी दरम्यानची सर्व धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. जे. जे., पोदार, एशियन, गुरुनानक, होली फॅमिली ते सेव्हन हिल अशी सर्व रुग्णालये एका मार्गावर येणार आहेत. शिवाय, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस्, जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, कीर्ती कॉलेज, सेंट झेव्हियर्स ते अंधेरीपर्यंतची सर्व महाविद्यालये जोडली जाणार आहे. धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांना जोडणा-या या मेट्रो-३ मागील विरोधाचे राजकारण थांबवावे, असे आवाहनही शेलार यांनी केले.