शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाला सव्वातीन कोटींचा गंडा

By admin | Updated: July 9, 2014 00:55 IST

कर्नाटकमध्ये १६ कोटींच्या बांधकामाचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून बेंगळुरूतील एका बंटी-बबलीने नागपूरच्या बांधकाम व्यावसायिकाला सव्वातीन कोटींचा गंडा घातला. रविशंकर तुमकुर संगन्ना

१६ कोटींच्या कंत्राटाचे आमिष : बेंगळुरूतील बंटी-बबली पसारनागपूर : कर्नाटकमध्ये १६ कोटींच्या बांधकामाचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवून बेंगळुरूतील एका बंटी-बबलीने नागपूरच्या बांधकाम व्यावसायिकाला सव्वातीन कोटींचा गंडा घातला. रविशंकर तुमकुर संगन्ना (रा. इंदिरानगर, बेंगळुरू) आणि बिट्टी श्रीदेवी ऊर्फ बोंलू तिमेयन श्रीदेवी (रा. आचल शेट्टी लेआऊट बेंगळुरू) अशी या बंटी-बबलीची नावे आहेत. वर्धा मार्गावरील राजीवनगरात श्रीकॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. ही बांधकाम व्यावसायिक फर्म आहे. २००८ मध्ये कर्नाटकातील श्रीदेवी प्रोजेक्ट प्रा. लि. या संस्थेने बेंगळुरूतील जुन्या बसस्थानकामागे निवासी प्रकल्प उभारण्याच्या बांधकामाचे कंत्राट देण्याची जाहिरात केली. त्यामुळे श्रीकॉन इन्फ्राच्या संचालकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. श्रीदेवी आणि रविशंकरसोबत ओळख झाल्यानंतर या बांधकामाचे कंत्राट १५ कोटी, ७५ लाखांमध्ये करण्याचा करार श्रीदेवी प्रोजेक्ट आणि श्रीकॉन इन्फ्रामध्ये झाला. अर्धवट बांधकाम सोडू नये म्हणून श्रीकॉनच्या संचालकांना ३ कोटी, ३० लाख रुपये सुरक्षा ठेव मागितली. श्रीकॉनच्या संचालकांनी ते श्रीदेवी प्रोजेक्टकडे जमा केले. २००८ मध्ये हे सर्व पार पडले. त्यानंतर श्रीकॉनच्या संचालकांनी बांधकामाची तयारी केली. मात्र, श्रीदेवी प्रोजेक्टचे संचालक (बंटी बबली) वेगवेगळी कारणे सांगून टाळू लागले.तब्बल चार वर्षे टाळाटाळ करणारे बंटी बबली सुरक्षा ठेवही परत करायला तयार नव्हते. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर श्रीकॉनच्या संचालकांनी हे प्रकरण कोर्टात नेले. कोर्टाने दोन्ही बाजू तपासल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून आणि श्रीकॉनचे व्यवस्थापक अमित मधुकरराव पोंगुलवार यांच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री सोनेगावचे एपीआय बी. एन. दायमा यांनी श्रीदेवी प्रोजेक्टचे संचालक श्रीदेवी आणि रविशंकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्या शोधासाठी लवकरच सोनेगावचे पोलीस पथक कर्नाटककडे जाणार आहे. (प्रतिनिधी)