शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा निराशाजनक अर्थसंकल्प

By admin | Updated: July 9, 2014 00:18 IST

रेल्वे अर्थसंकल्पाने नवी मुंबईसह पनवेल परिसरातील लाखो प्रवाशांना निराश केले आहे.

नवी मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पाने नवी मुंबईसह पनवेल परिसरातील लाखो प्रवाशांना निराश केले आहे. पनवेल - सीएसटी फास्ट ट्रेनसह इतर कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही. रेल्वे डबे वाढविण्यासह नवीन स्थानकांचे काय होणार याचे उत्तर मिळालेले नसून अर्थसंकल्पाने घोर निराशा केल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे. 
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे नवी मुंबई, पनवेलमधील प्रवाशांच्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भरभरून मतदान केले आता प्रवाशांना चांगले दिवस येणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु रेल्वे अर्थसंकल्पात हार्बर व ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी एकही ठोस योजना दिसली नाही.  हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढत असून ट्रेनची संख्या व डबे वाढविण्याची मागणी प्रवासी करत आहेत. पनवेलवरून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाण्यासाठी दीड तास लागत आहे. या मार्गावर फास्ट ट्रेन सुरू करण्यात यावी. पनवेल -उरण, पनवेल - कजर्त, सीवूड -उरण रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
 
प्रवाशांची 
तीव्र नाराजी
रेल्वे प्रवाशांनीही अर्थसंकल्पाविषयी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प येतो. परंतु रेल्वे क्रॉसिंग, पाणपोई, इंडीकेटर, पंखे यासारखे छोटे प्रश्नही सुटत नाही. रेल्वे स्थानकांमध्ये अपंग प्रवाशांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. स्टेशनच्या इमारती भव्य आहेत परंतु येथे सुविधा अजिबात मिळत नाही. सरकारने यावेळीही हार्बरवरील प्रवाशांना वा:यावर सोडले असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. 
 
ठोस उपाययोजना नाहीत
4ट्रान्स हार्बर मार्गावर नवी मुंबईत पाच रेल्वे स्टेशन आहेत. या मार्गावर खैरणो- बोनकोडे व दिघा येथे रेल्वे स्टेशन मंजूर झाले आहे. सदर रेल्वे स्टेशनच्या बांधकामाविषयी ठोस उपाययोजना दिसत नाही. हार्बर मार्गावरील प्रवाशांना गृहीतच धरले नसल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली असून हेच का चांगले दिवस असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 
रेल्वेमंत्र्यांना भेटून समस्या मांडणार
4ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली. ट्रेनची संख्या वाढविणो, डबे वाढविणो, फास्ट ट्रेन सुरू करणो यापैकी कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही. ट्रान्स हार्बर मार्गावरील दिधा व बोनकोडे स्टेशनचे बांधकाम कोण व कधी करणार यासाठी ठोस तरतूद नाही. सीवूड -उरण मार्गासाठीही तरतूद दिसत नाही. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची घोर निराशा झालेली आहे. राष्ट्रवादीचे आजी व माजी खासदार रेल्वे मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे या समस्या मांडणार आहोत असे सांगितले. 
 
तोंडाला पाने पुसली
4रेल्वे प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत धुरत यांनी अर्थसंकल्पाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी हार्बर मार्गावर फास्ट ट्रेन सुरू व्हावी अशी मागणी केली होती. कजर्त पनवेल, उरणचा प्रश्न सुटावा व इतर मागण्यांसाठी आम्ही पाठपुरावा केला होता. परंतु अर्थसंकल्पात कोणीही ठोस तरतूद नसून हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या तोंडाला चक्क पाने पुसली असल्याचे मत व्यक्त केले आहे.