शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सेवांना बळकटी देणारा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 19, 2017 02:29 IST

राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सेवा-सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, मुंबई, नागपूर आणि पुण्याच्या मेट्रो प्रकल्पांसह विमानतळ, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रांसाठी

- सचिन लुंगसे

राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सेवा-सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, मुंबई, नागपूर आणि पुण्याच्या मेट्रो प्रकल्पांसह विमानतळ, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ‘महाइन्फ्रा’ ही संस्था स्थापन करण्यात येणार असून, रस्ते व बांधकामांसाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने पायाभूत सेवांना आणखी बळकटी येणार आहे.मेट्रो शहरांच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई, नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पांसाठी ७१० कोटी देण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीसाठी १ हजार ६०० कोटींच्या निधीमुळे शहरे आणखी स्मार्ट होणार असून, विकासाचा वेग वाढण्यास मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागात २ लाख ५० हजार घरे बांधण्यात येणार असल्याने घरांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १ हजार ६३० कोटी निधी राखून ठेवण्यात आल्याने रस्त्यांचे जाळे वाढणार असून, ५७० कोटी रुपये एवढा निधी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत मिळणार आहे.विमानतळांना संजीवनी : विमानतळांच्या विकासासह प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ५० कोटींच्या तरतुदीमुळे या क्षेत्रालाही बळकटी मिळणार आहे. शिर्डी विमानतळाचा जलदगतीने विकास होईल. नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.