शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘वित्तीय शिस्तीला बळकटी देणारा अर्थसंकल्प’

By admin | Updated: February 4, 2017 02:00 IST

केंद्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा वित्तीय शिस्तीला अधिक बळकट करणारा आणि नोटाबंदीला चोख उत्तर देऊन नव्या वातावरणाकडे नेणारा

मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा वित्तीय शिस्तीला अधिक बळकट करणारा आणि नोटाबंदीला चोख उत्तर देऊन नव्या वातावरणाकडे नेणारा ठरला आहे, त्याचबरोबर यातून दीर्घकालीन परिणाम साधत वित्तीय तूट ३.२ इतक्या प्रमाणात कमी होणार आहे, असा विश्वास खासदार व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचे विश्लेषण करण्याचा उपक्रम गेली चार वर्षे आयोजित करण्यात येत आहे. पायाभूत सुविधा, शेती, रेल्वे, ग्रामविकास यांना प्रामुख्याने विकासाच्या बाबतीत चालना देण्याचे कार्य या अर्थसंकल्पाने केले. त्यामुळेच प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग वित्तीय तुटीचा आकडा कमी करण्यावर तसेच राष्ट्रीय उत्पन्नात अधिक भर टाकण्यासाठी होणार आहे. अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती खोटी ठरवीत त्याचे परिणाम १ एप्रिलपासून सकारात्मकरीत्या दिसतील, असा आशावादही डॉ.नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)