शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठपणाविषयीच्या जाहिरातींचा ‘फुगा’

By admin | Updated: January 22, 2015 00:39 IST

वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचा मारा आदी विविध कारणांमुळे व बदलत्या जीवनशैलीत कष्टाची कामे घटल्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे.

मिलिंद कांबळे - पिंपरीवेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूडचा मारा आदी विविध कारणांमुळे व बदलत्या जीवनशैलीत कष्टाची कामे घटल्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. यावर उपाय म्हणून औषधोपचार व विविध तंत्रांचा वापर केला जातो. यासाठी आकर्षक जाहिरातबाजी करीत नागरिकांना भुलविण्याचे काम सध्या सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या औषधोपचारांचा लाभ होण्यापेक्षा मनस्ताप व फसवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरात वजन वाढलेल्या नागरिकांची संख्या फुगतच चालली आहे. यात लहान मुलांचीही संख्या दिसून येते. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. लठ्ठपणा घटविण्यासाठी विविध संस्थांतर्फे आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. त्याची आकर्षक जाहिरात केली जाते. या जाहिरातीच्या माहितीला भुलून अनेक जण मोठी रक्कम भरून या योजनेचा लाभ घेतात. काही महिने उलटल्यानंतर प्रत्यक्षात त्याचा कोणताच लाभ होत नसल्याचे दिसून येते. उलट, इतर आजार झाल्याने त्रास सहन करावा लागतो. यातून फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. यामुळे वैतागलेले नागरिक वजन घटविण्यापेक्षा आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करतात. ऐकीव व इतर माहितीच्या आधारे व्यायाम आणि औषधांचे सेवन सुरू करतात. अपेक्षित लाभ मिळत नसल्याने अखेरीस वजन कमी करण्याचा उत्साह मावळतो. वजन घटविण्याच्या नाना तऱ्हा ‘ग्रीन टी’ घेणे. विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या औषधांचे सेवन करणे. पोट, कंबर आणि मांड्यांना निरनिराळ्या पद्धतीचे पट्टे लावणे. व्यायाम आणि योगासने करणे, धावणे, पोहणे, चालणे आणि सायकलिंग करणे. आहार कमी करुन पथ्य पाळणे, आदी निरनिराळे उपाय सांगितले जातात. प्रत्येक संस्था आणि केंद्राच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. विशिष्ट कालावधीत अमुक किलो वजन कमी करण्याचा दावा केला जातो. सप्लिमेंट फूडचा मारा सप्लिमेंट फूड देऊन वजन घटविणे, तसेच वजन वाढविण्याची एक पद्धत आहे. हे सप्लिमेंटचे सेवन केल्याने वजन कमी होत असल्याचा दावा केला जातो. या सप्लिमेंटचे डब्बे हजारोच्या किमतीत आहेत. काहींना या सप्लिमेंटच्या दुष्परिणामास सामोरे जावे लागते. तंत्रांसाठी हजारोंचे शुल्क अद्ययावत दालन उघडून विशिष्ट औषधे घेणे, मसाज करणे, व्यायाम करणे, पोटास पट्टा लावणे आदी पद्धतीचा अवलंब केला जातो. यासाठी हजार ते लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. यासाठी मर्यादित कालावधी ठरविला जातो. मसाज आणि इतर गोष्टींसाठी स्वतंत्र मार्गदर्शकही असतो. नियमित आहारावर निर्बंध घातले जातात. सांगितल्याप्रमाणे आहार घेणे सक्तीचे केले जाते. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे घ्यावीत ठराविक औषधे डॉक्टरांना विचारून आणि वयानुसार घ्यावीत. नियमितपणे व्यायाम, आहार आणि आवश्यक योग्य औषधामुळे वजन घटविण्यास मदत होते. व्यायामामुळे सडपातळ, उत्साही आणि प्रसन्न राहण्यास मदत होते. - डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी