शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

फुग्याच्या गॅस सिलिंडरचा स्फोट

By admin | Updated: December 25, 2015 04:32 IST

कल्याण पूर्वेतील नांदिवली गावात असलेल्या आर्य गुरुकुल शाळेत गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास फुग्यात गॅस भरणाऱ्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.

कल्याण : कल्याण पूर्वेतील नांदिवली गावात असलेल्या आर्य गुरुकुल शाळेत गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास फुग्यात गॅस भरणाऱ्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यात फुगेविक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आणि पाच विद्यार्थी, सात पालक असे १२ जण जखमी झाले. शाळेतील आनंद मेळ्यावेळी ही घटना घडली. जखमींतील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले असून उरलेल्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून गॅस सिलिंडरच्या दर्जासह फुगेविक्रेत्याला तेथे उभे राहण्यास कोणी परवानगी दिली, त्याची चौकशी सुरू केली आहे. रामदरस प्रसाद (५०, रा. कल्याण पूर्व) असे फुगेविक्रेत्याचे नाव आहे आणि तो नेहमीच शाळेच्या परिसरात असतो, अशी माहिती मिळाली आहे. क्र ीडांगणाबाहेर फुग्यांमध्ये गॅस भरणारा सिलिंडर आणि रंगीबेरंगी फुगे घेऊन रामदरस उभा होता. शाळेतील लहान मुलांनी पालकांकडे हट्ट करत या फुग्यांसाठी तेथे गर्दी सुरू केली. त्याच वेळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, फुगेवाला काही फूट उंच उडाला आणि शाळेच्या पत्र्यांना आपटून खाली कोसळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या वेळी फुगेवाल्याच्या भोवती असलेली, तेथून जाणारी मुले, पालक या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले. गॅसमुळे त्यांचे डोळे, चेहरा, हाताला जखमा झाल्या. ते भाजले. जखमी झालेली सर्व मुले ज्युनिअर आणि सीनिअर केजीतील आहेत. जखमींतील काहींना डोंबिवलीच्या एम्स रु ग्णालयात, तर काही मुले व पालकांना कल्याणच्या मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.