शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे निकृष्ट; बोंडअळीचा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:25 IST

निकृष्ट बीटी बियाण्यांमुळे गतवर्षी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला असताना यंदाही निकृष्ट बियाण्यांची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे.

- सदानंद सिरसाट

अकोला : निकृष्ट बीटी बियाण्यांमुळे गतवर्षी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला असताना यंदाही निकृष्ट बियाण्यांची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रयोगशाळेतील चाचणीत तीन कंपन्यांचे बीटी बियाणे सदोष आढळून आल्याने संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.यंदा बोंडअळी रोखण्यासाठी बीटी कापूस बियाण्यांची पेरणीपूर्वीच काटेकोर तपासणी करण्याचा आदेश शासनाने दिला असल्याने मे महिन्यात बीटी कापूस बियाण्यांचे नमुने घेण्यात आले. त्यांची तपासणी नागपूर येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामध्ये तीन बियाणे उत्पादक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने अपयशी ठरले आहेत. दोन कंपन्यांच्या बीटी बियाण्यांमध्ये बोंडअळी रोखणाऱ्या जीन्सचे प्रमाण अत्यल्प आढळले आहे, तर एका कंपनीच्या बियाण्यामध्ये रेफ्युजी बियाण्यात बीटीचे प्रमाण अधिक आढळले. त्या बियाण्यांच्या वापर झालेल्या भागात बोंडअळीच्या धोका होण्याचा संभव आहे.कंपन्यांचे सरकारला आव्हानगेल्या वर्षी राज्यभरात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रकोप झाला. पीक नुकसानासाठी सरकारने घोषित केलेली मदत अद्यापही शेतकºयांच्या पदरात पडली नाही. बियाणे कंपन्या, विमा कंपन्या आणि शासनाची मिळून हेक्टरी ३६ हजार रुपये देत असल्याचे सरकारने उत्साहाच्या भरात जाहीर केले आहे. मात्र, कापूस बियाण्यातील बीटी तंत्रज्ञान विदेशी कंपनीकडून घेतले असल्यामुळे तंत्रज्ञानाच्या अपयशाची भरपाई आम्ही करणार नाही, असा पवित्रा घेत बियाणे कंपन्यांनी सरकारच्या दाव्यालाच आव्हान दिले आहे.सत्या, राशी, तुलशी कंपन्यांचा समावेशबियाणे नमुन्यात बीटी जीन्सचे प्रमाण कमी आढळल्याने हैदराबाद येथील सत्या अ‍ॅग्रो बायोसीड, कोईम्बतूर येथील तुलसी सीड्स, तर रेफ्युजीमध्ये बीटी बियाणे अधिक आढळल्याप्रकरणी गुंटुर येथील राशी सिड्सला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी जी.आर. बोंडे यांनी सात दिवसांत कंपनीला खुलासा मागवला आहे. एसएसपी खताचे नमुने अपयशी ठरल्याप्रकरणी रामा फॉस्फेट, इंदूर, निरमा लिमिटेड अहमदाबाद या कंपन्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

टॅग्स :cottonकापूस