कोल्हापूर /रत्नागिरी/सिंधुदुर्ग : भारत संचार निगम लिमिटेडच्या कोल्हापूर कार्यालयातील सहाय्यक महाव्यवस्थापक प्रभाकर पाटील यांचे कार्यालय, निवासस्थान आणि रत्नागिरीतील घरावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने गुरुवारी छापे टाकले. सिंधुदुर्गातील त्यांच्या मालमत्तेची चौकशीही पथकाने केली. त्यात पाटील यांचे रत्नागिरीत आठ फ्लॅट आणि एका व्यापारी गाळ्यासह ४३ लाखांची स्थावर मालमत्ता तसेच १ लाख २० हजारांची रोकड, ५३ लाखांची मुदतठेव प्रमाणपत्रे आणि विविध कंपन्यांचे शेअर्स मिळाले. सीबीआयने महाव्यवस्थापक एम. आर. रावत यांची कोल्हापुरात भेट घेतली. त्यांनी त्यासाठी परवानगी देताच पथकाने पाटील यांच्या कक्षाची झडती घेतली. त्यानंतर पथकाने पाटील यांच्या घराचीही झडती घेतली. त्यातून पाटील यांनी इतकी माया जमविल्याचे आढळले.
‘बीएसएनएल’ अधिकाऱ्याच्या मालमत्तेवर छापा
By admin | Updated: May 1, 2015 02:00 IST