शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयी आई-वडिलांनी स्त्रीलिंगी अर्भक पुरले जमिनीत

By admin | Updated: July 10, 2016 21:37 IST

अज्ञाताने आठ ते नऊ महिन्यांच्या स्त्रिलिंगी अर्भकाला जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

ऑनलाइन लोकमतअमरावती : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपुरात निर्दयतेचा कळस गाठणारी घटना शनिवारी उघडकीस आली. अज्ञाताने आठ ते नऊ महिन्यांच्या स्त्रिलिंगी अर्भकाला जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

एकीकडे मुलींची संख्या वाढविण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न केले जात आहे. जनजागृती करून मुलींची हत्या थांबविण्याचे आवाहन शासनाने केले आहे. मात्र, आजही काही निर्दयी आई-वडिल आपल्या जन्मजात मुलींची हत्या करीत असल्याचे या घटनेवरून लक्षात येत आहे.

नारायणपूर येथील रहिवासी सुधाकर पंजाब जुनघरे यांच्या मालकीच्या खुल्या जागेत शनिवारी काही श्वान स्त्रि अर्भकाचे लचके तोडत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले होते. या प्रकाराची माहिती नागरिकांनी पोलीस पाटील नितीन बबब तेलखेडे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता ८ ते ९ महिन्याचे स्त्री अर्भक हे अर्धा फूट जमीन खोदून पुरविण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मात्र, त्या अर्भकाला श्वानाने बाहेर काढल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी तत्काळ वलगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार वलगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बाबील यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नितीन तेलखडे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३१८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अर्भकाचे इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून सद्यस्थितीत ते मृत अर्भक शवगारात ठेवण्यात आलेले आहेत. पुढील चौकशी वलगाव पोलीस करीत आहेत.