शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

ब्रसेल्समध्ये जखमी झालेल्या निधी परतल्या

By admin | Updated: May 7, 2016 02:17 IST

बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या जेट एअरवेजच्या कर्मचारी निधी चाफेकर शुक्रवारी मुंबईत परतल्या. सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी

मुंबई : बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या जेट एअरवेजच्या कर्मचारी निधी चाफेकर शुक्रवारी मुंबईत परतल्या. सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी त्या सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाल्या. निधी यांना पुढील उपचारासाठी ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी निधी आपल्या कुटुंबीयांना काही वेळासाठी हॉटेलमध्ये भेटल्या. पती रूपेश, मुलगा वर्धन (१४) आणि मुलगी वृषी (११) व निधी यांची जवळपास दीड महिन्यानंतर भेट झाली. निधी यांच्या वहिनी माधुरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भविष्यातही निधीवर उत्तम उपचार व्हावे याकरिता आवश्यक ती मदत करण्यात येईल, अशी माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी दिली. (प्रतिनिधी)ब्रसेल्स हल्ल्याचा चेहरा २२ मार्च रोजी ब्रसेल्स विमानतळावर दहशतवाद्यांनी दोन हल्ले केले. त्यावेळी निधी नेवॉर्कला जाण्यासाठी ब्रसेल्स विमानतळावर उपस्थित होत्या. यात निधी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. या हल्ल्यात त्या १५ टक्के भाजल्या होत्या. त्यावेळी त्यांना ब्रसेल्स येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निधी जवळपास २५ दिवस कोमात होत्या. या दरम्यान त्यांच्या शरीरावरील त्वचेचे ग्राफ्टिंग करण्यात आले. गुरुवारी तेथील स्थानिक रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांना पॅरिस येथे आणण्यात आले. तेथून निधी मुंबईला आल्या. हल्ल्यानंतर काही क्षणांत निधी यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता.