शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी अपघात; नगरसेवक आक्रमक

By admin | Updated: May 19, 2016 01:27 IST

बीआरटी मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली.

पुणे : नगर रस्ता बीआरटी मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली. या अपघातप्रकरणी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन फलक फडकाविल्याने सभेचे कामकाज बंद पाडले. अखेर महापौर प्रशांत जगताप यांनी सभा तहकूब केली.नगर रस्ता बीआरटी मार्ग सुरू झाल्यापासून त्यावर सतत अपघात होत आहेत. महापौर जगताप, पर्यायाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने घाईघाईत हा मार्ग सुरू केला, असा आरोप केला जात आहे. सभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी बीआरटी मार्गाच्या विरोधात घोषणा लिहिलेले फलक सभेत फडकावले. पीएमपीएमएल अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हे अपघात होत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. संस्थेचे काही काम असले, विशेषत: महापालिकेकडून पैसे घ्यायचे असतील तर पीएमपीएमएलचे व्यवस्थापक अभिषेक कृष्णा सभेला उपस्थित राहतात, आता ते कुठे आहेत, अशी विचारणा शिंदे यांनी केली. शिंदे यांच्या या आक्रमक सवालामुळे भाजपा तसेच सेनेचे सदस्यही जोरजोरात घोषणा देऊ लागले. सेनेच्या संजय भोसले, पृथ्वीराज सुतार यांनी नागरिकांना मारण्यासाठी म्हणून बीआरटी मार्ग सुरू केला आहे का? असा प्रश्न महापौरांना केला. सर्व अपघातांना पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. असा मार्ग सुरू करण्यापूर्वी त्यात येणाऱ्या सर्व अडथळ्यांची माहिती घेणे गरजेचे असते. तसे काहीही न करता केवळ नेत्यांची तारीख मिळाली, म्हणून घाईने उद््घाटन केल्याची टीका भाजपाचे गणेश बीडकर, धनंजय जाधव यांनी केली. (प्रतिनिधी)