शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भावाची तफावत : पणन महासंघाच्या बंडीत टाकले नाही एकही बोंड

By admin | Updated: November 17, 2016 20:24 IST

यावर्षीच्या कापूस हंगामात पणन महासंघाकडून १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. मात्र तीन दिवस उलटूनही शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठखामगाव, (जि.बुलडाणा) : यावर्षीच्या कापूस हंगामात पणन महासंघाकडून १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. मात्र तीन दिवस उलटूनही शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कापसाच्या भावात तफावत असल्याने पणन महासंघाची आतापर्यंत कापूस खरेदी झालीच नाही.

राज्यात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने कापूस खरेदी करण्यात येते. पुर्वी दिवाळीच्या अगोदरच हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू होत असून यावर्षी ४ हजार १६० रूपये हमीभावाने कापूस खरेदी पणन महासंघाकडून ठरविली आहे. जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा येथे पणन महासंघाची कापूस खरेदी केंद्र आहेत. यावर्षी १५ नोव्हेंबरला जिल्ह्यात केवळ जळगाव जामोद केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांनी काटापूजन केले. मात्र येथे कापूस खरेदीसाठी आला नाही. तीन दिवसाचा कालावधी उलटूनही एकही बोंडाची कापूस खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या केंद्राकडे पाठ फिरविली आहे. खाजगी व्यापाऱ्यांनी ४७०० ते ४८०० रूपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी सुरू आहे. पणन महासंघापेक्षा जादाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी व्यापाऱ्यांना पसंती दिली आहे. (शहर प्रतिनिधी)गतवर्षी ७ हजार क्विंटल कापूस खरेदीपणन महासंघाच्यावतीने गतवर्षी जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा या तीन केंद्रावर कापूस खरेदी करण्यात आली होती. गतवर्षी कापसाला ४ हजार १०० रूपये प्रति क्विंटल भाव होता. तीनही केंद्रावर ७ हजार १०० क्विंटल कापूस खरेदी केली होती. यावर्षी शासनाने केवळ ६० रूपये कापसाची भाववाढ करून ४१६० रूपये प्रति क्विंटल हमीदर ठरविला आहे.