शिरपूर (धुळे) : एसटीने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या थाळनेर येथील नितीन साळुंखे (३९) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात नितीन यांच्या बहिणीच्या घरासमोरच घडला़नितीन हे दोन दिवसांपूर्वी बहीण भारती बडगुजर यांच्याकडे आले होते. तेथून ते सोमवारी चोपडा येथे गेले होते. चोपड्याहून दुचाकीने परत येताना बहिणीच्या घरासमोरच अपघात झाला होता. (वार्ताहर)
बहिणीच्या घरासमोरच भावाचा मृत्यू
By admin | Updated: February 9, 2017 05:29 IST