शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम कुटुंबाची अशीही ‘भाऊबीज’

By admin | Updated: October 24, 2014 04:00 IST

दीपावलीत करदोऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दीपावलीतील भाऊबीजेचा उत्सव करदोऱ्याशिवाय साजराच होऊ शकत नाही.

योगेश गुंड, अहमदनगरदीपावलीत करदोऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दीपावलीतील भाऊबीजेचा उत्सव करदोऱ्याशिवाय साजराच होऊ शकत नाही. राखीप्रमाणेच बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असणारा हा करदोरा बनविण्याचे काम जिल्ह्यातील मुस्लीम कुटुंबाची पाचवी पिढी करीत आहे. चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील इम्रान युसुफशेठ आसार यांचे सारे घरदार एक महिन्यापासून करदोरा बनविण्याच्या कामात व्यस्त आहे. अगदी लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत घरातील साऱ्यांचेच हात करदोरा बनविण्याच्या कामात गुंतले आहेत. गेल्या पाच पिढ्यांपासून करदोरा बनविणे व विकणे हा त्यांचा पिढीजात व्यवसायच बनला आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी यमद्वितीया म्हणजे भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. बहीण भावाला ओवाळून त्याला करदोरा बांधण्यासाठी देते. करदोरा बनविण्याची पद्धती व कला आम्हाला आमच्या घरच्यांकडूनच शिकायला मिळाली. नगरमधून काळ्या-लाल रंगाचा कच्चा माल आणून तो चरख्यावर विणला जातो. साधारण सरासरी ४२ इंच असणारा धागा तयार करून या धाग्याला गुंडी लावली जाते. त्यानंतर त्यावर पिवळ्या रंगाचा दोरा चढवावा लागतो. सर्वांत शेवटी रेशमी पालखी गोंडा लावून करदोरा तयार केला जातो. यातून मिळणारे उत्पन्न अल्प असले तरी महाराष्ट्रीय म्हणून आपली वेगळी ओळख करून देणारा करदोरा बनविण्याचे भाग्य मिळते, असे इम्रान आसार यांनी सांगितले. या व्यवसायातूनच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या व्यवसायात इतर कारागीर असले तरी गोंडा पालखी करदोरा बनविण्यात आमच्या कुटुंबाचा हातखंडा असल्याचेही त्यांनी सांगितले.