शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहांची रसद तोडली; रेशनिंगच्या धान्याचा पुरवठा बंद

By admin | Updated: January 17, 2016 02:58 IST

राज्यातील अनाथ, निराधार बालकांचे संगोपन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहांचे अनुदान गेल्या तीन वर्षांपासून बंद करण्यात आलेले असतानाच राज्य शासनाने बीपीएल दराने वितरित करण्यात

मुंबई : राज्यातील अनाथ, निराधार बालकांचे संगोपन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहांचे अनुदान गेल्या तीन वर्षांपासून बंद करण्यात आलेले असतानाच राज्य शासनाने बीपीएल दराने वितरित करण्यात येणाऱ्या गहू-तांदळाचा पुरवठाही बंद केला आहे.पुरवठा विभागाकडून बालगृहांना दरमहा नारी निकेतन योजनेंतर्गत नियमितपणे मिळणारे धान्य अचानक बंद झाल्याने महाराष्ट्रातील १ हजार बालगृहांतील ८० हजारांवर अनाथ, निराधार बालकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. राज्यात महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्थांची १ हजार बालगृहे कार्यरत आहेत. या संस्थांना शासनाकडून प्रति दिन प्रति बालक २१ रुपये अनुदान मिळते, हे अनुदानही गेल्या तीन वर्षांपासून नसल्याने बालगृहे बिकट परिस्थितीतून जात असताना गेल्या चार महिन्यांपासून पुरवठा विभागाकडून बीपीएल दराने मिळणारे गहू आणि तांदळाचे नियतन बंद झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती झाली आहे. खुल्या बाजारातून धान्य खरदी करणे संस्थाचालकाना परवडत नाही. पुरवठा विभागाने बालगृहांची दयनीय स्थिती बघता या सेवाभावी संस्थांना पूर्वीप्रमाणे विनाविलंब बीपीएल दराने गहू, तांदूळ देण्याचे संबंधित तालुक्याच्या पुरवठा यंत्रणेला आदेशित करावे, अशी मागणी स्वयंसेवी बालगृहचालक करीत आहेत.एकीकडे राज्यातील शासकीय गोदामात स्वस्त धान्य अक्षरश: सडून जात असताना बालगृहातील निराश्रित बालकांना धान्यासाठी झगडावे लागत असल्याची विसंगती सुन्न करणारी आहे. राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या प्रश्नी लक्ष घालून बालगृहांना न्याय मिळवून द्यावा. - रवींद्रकुमार जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष, महाराष्ट्र बालगृह चालक संघटना