शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘इंग्रजांच्या खबऱ्यांनी देशभक्ती शिकवू नये’

By admin | Updated: February 20, 2016 03:07 IST

हौतात्म्याचा वारसा असणाऱ्या राहुल गांधींना स्वातंत्र्य लढ्यातील इंग्रजांच्या खबऱ्यांचे वारसदार देशभक्ती शिकवणार का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.

मुंबई : हौतात्म्याचा वारसा असणाऱ्या राहुल गांधींना स्वातंत्र्य लढ्यातील इंग्रजांच्या खबऱ्यांचे वारसदार देशभक्ती शिकवणार का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. ते गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.देशातील वर्तमान परिस्थितीवर चिंता व्यक्त करून खा. चव्हाण यांनी सद्य:स्थितीला केंद्रातील भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारणीभूत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रोहित वेमुला आणि जेएनयू प्रकरणात विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावरून भाजपा व संघाने काँग्रेस व राहुल गांधींविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. केंद्र सरकार आणि संघ हेच केवळ देशप्रेमी आणि त्यांना विरोध करणारे इतर सर्व देशद्रोही, असे वातावरण देशात निर्माण केले जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मारेकऱ्याची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यास समर्थन देणाऱ्यांना राष्ट्रभक्तीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, असा सवालही खा. चव्हाण यांनी केला.राजकीय लाभासाठी भाजपा देशातील सामाजिक सौहार्दाला तडा देत आहे. देशभरातील काँग्रेस नेत्यांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. साहित्यिक, कलावंत, पत्रकार, विद्यार्थी अशा प्रत्येक घटकावर विद्यमान सरकारची दडपशाही सुरू आहे. संघाची मानसिकताच हुकूमशाही समर्थक असल्यामुळे राजस्थानातील भाजपाचा आमदार राहुल गांधींना गोळ्या घालण्याची भाषा करतो. काँग्रेस पक्ष त्याचा वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवेल, असे खा. चव्हाण म्हणाले.