शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा

By admin | Updated: June 7, 2017 02:01 IST

ब्रिटिशकालीन अमृतांजन पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : ब्रिटिशकालीन अमृतांजन पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत आहे. त्यामुळे हा पूल पाडण्याच्या हालचाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केल्या आहेत. याकरिता महामंडळाने सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यासाठी येत्या २४ जुलैपर्यंत मुदत आहे.पुणे व रायगड जिल्ह्याला जोडणारा हा ऐतिहासिक पूल आहे. खंडाळा घाटात इंग्रज अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस यांनी मेजर जनरल जॉन मालकोल्म जी.सी.ई. अँनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली १८३० मध्ये उभारला. बोरघाटातील रेल्वेच्या रिव्हसिंग पॉइंट येथे या पुलाची उभारणी केली असल्याची कोनशिला पुलाच्या प्राचीनतेची साक्ष देत आहे. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेला हा प्राचीन पूल मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी अडथळा ठरू लागला आहे. हा पूल पाडून या ठिकाणची वळणे काढून रस्ता सरळ झाल्यास या परिसरात होणारी वाहतूककोंडी व अपघात दोन्ही कमी होतील, असे महामंडळाचे मुख्य अभियंता एस. मुंगीलवार यांनी सांगितले. सदरचा पूल हा रेल्वेच्या ताब्यात असल्याने याबाबत रेल्वे प्रशासनाशी देखील पत्रव्यवहार केला असून, नागरिकांच्या याबाबत सूचना व हरकती मागविल्या आहेत.मुंबई-पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारे अंतर कमी व्हावे. ही शहरे जलदगतीने जोडली जावीत, याकरिता द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, खंडाळा बोरघाटातील खोपोली ते खंडाळा परिसरात द्रुतगती महामार्ग बनविताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या परिसरात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्ग एकत्र आले. त्यातच घाट क्षेत्रातील चढण व उतारामुळे या परिसरात अपघात व वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. द्रुतगतीवर दुतर्फा असलेल्या मार्गिकांपैकी सर्वांत शेवटची लाईन ही अवजड वाहनांसाठी, मधली लेन ही हलक्या वाहनांसाठी व कॉरिडोरच्या लगतची लेन ही ओव्हर टेकिंगसाठी असा नियम असताना अमृतांजन पुलाखालील अरुंद जागेमुळे या ठिकाणी नियमाला छेद देत शेवटची लेन हलक्या वाहनांसाठी व मधली लेन अवजड वाहनांसाठी असे फलक लावलेले असल्याने या ठिकाणी लेन कटिंगची समस्या मोठी आहे. अमृतांजन पुलाच्या खाली रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना उतारावर वळण घेता येत असल्याने वाहने उलटून अनेक अपघात झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी सध्या रस्ते विकास महामंडळाने सदरचा पूल पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.हा पुल पाडण्याऐवजी प्रशासनाने इतर उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. >चुकीचा निर्णय : पर्यायी रस्ता बनविण्याची गरजमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटात होणारे अपघात व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी खालापूर ते लोणावळ्यातील सिंहगड कॉलेज दरम्यान नवीन पर्यायी रस्ता बनविण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व संबंधित अधिकाऱ्यांनी या नवीन कामाची पाहणी करून निविदाप्रक्रियादेखील केली आहे. कुसगाव ते गारमाळ परिसरात रोडची मार्किंग झालेली असताना पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल पाडण्याचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.