शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्याबंदीचा कायदा आणू - सुब्रह्मण्यम स्वामी

By admin | Updated: June 19, 2017 02:45 IST

देशात गोहत्याबंदीचा सक्षम कायदा आणण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार येत्या दोन वर्षांत अशा प्रकारचा कायदा आणेल, अशी माहिती भाजपा नेते, खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशात गोहत्याबंदीचा सक्षम कायदा आणण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार येत्या दोन वर्षांत अशा प्रकारचा कायदा आणेल, अशी माहिती भाजपा नेते, खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी दिली.विराट हिंदुस्थान संघम, मुंबई स्टॉक एक्स्चेंज आणि इस्कॉनने ‘भारतीय गायीं’वर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत सुब्रह्मण्यम स्वामी बोलत होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह अन्य मान्यवर या परिषदेस उपस्थित होते. गोरक्षण म्हणजे मानसिक गुलामगिरीतून मुक्तता असल्याचे प्रतिपादन स्वामी यांनी यावेळी केले. गायीचे मांस खाणे हा इस्लामचा मूलभूत घटक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोहत्याबंदीचा कायदा करण्यात कसलीच अडचण नाही. गोरक्षणाच्या नावाखाली मागील काळात जो हिंसाचार झाला तो गुंडांनी घडवून आणला होता, असा दावा करतानाच गोरक्षक योग्य पद्धतीने आपले काम करीत आहेत. त्यांचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी त्यांना ओळखपत्र देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गोरक्षकांच्या आडून भविष्यात कोणीही रस्त्यावर हिंसाचार व अडवणूक करू शकणार नाही, असे स्वामी म्हणाले.काँग्रेस सरकारने आपल्या कार्यकाळात विविध प्रकारचे अनुदान देत गोमांस निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा सपाटा लावला होता. भाजपाची सत्ता आल्यापासून गोमांस निर्यातीला चाप लावण्याचे काम सुरू आहे. गोमांस निर्यातीला उत्तेजन देणाऱ्या १३ अनुदान योजना भाजपा सरकारने आपल्या कार्यकाळात बंद केल्या आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे गोमांस निर्यातीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचेही स्वामी यांनी या वेळी सांगितले. गोरक्षण, गोसंवर्धन आदीसाठी एका विशेष अ‍ॅपचेही या वेळी स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.