मुंबई : राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह हे आता राज्य शासनाचे प्रवक्ते असतील. असे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज याबाबतचा आदेश काढला. आयपीएस अधिकारी असलेले ब्रिजेश सिंह यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालकपदाची धुरा सोपविली. नंतर त्यांच्याकडे विभागाचे सचिवपदही देण्यात आले. आता त्यांच्यावर शासकीय प्रवक्तेपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ते राज्य शासनाचे विविध विभाग, त्यांच्या लोकाभिमुख योजना किंवा महत्त्वपूर्ण घडामोडींबाबत वेळोवेळी शासनाची अधिकृतपणे बाजू मांडतील. सर्व शासकीय विभागांनी त्यांना जी माहिती लागेल ती तातडीने पुरविण्याची व्यवस्था करावी, असा आदेशही देण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
ब्रिजेश सिंह आता शासनाचे प्रवक्ते
By admin | Updated: November 17, 2016 03:55 IST