शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ स्थानकातील पूल अर्धवट

By admin | Updated: June 29, 2016 02:43 IST

माथेरानला जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकावर उतरावे लागते, त्यामुळे नेरळ स्थानकाला विशेष महत्त्व आहे.

कर्जत : माथेरानला जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकावर उतरावे लागते, त्यामुळे नेरळ स्थानकाला विशेष महत्त्व आहे. मात्र हे रेल्वे स्थानक अनेक सुविधांपासून वंचित आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत एन्डकडील नेरळ या जंक्शन उपनगरीय रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाचे काम रेल्वेने सुरू केले आहे. ब्रिटिशकाळापासून असलेला पादचारी पूल जुना झाल्याने हा नवीन पादचारी पूल मंजूर करण्यात आला आहे. मात्र २००४ मध्ये बांधकाम सुरु करण्यात आलेल्या अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पुलाचे काय, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेने उपस्थित केला आहे.नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी नॅरोगेज मार्ग आहे. त्यामुळे जंक्शन रेल्वे स्थानक असलेल्या नेरळ स्थानकाला पर्यटनदृष्ट्या महत्त्व आहे. त्याचवेळी मुंबईचे उपनगर म्हणून झपाट्याने नेरळ विकसित होत असल्याने रेल्वे प्रशासनाने येथील प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून नवीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थानकात ब्रिटिशकाळात उभारलेला पादचारी पूल असून २००३ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार माथेरानला जात असताना नेरळ स्थानकात काही काळ थांबले. त्यावेळी नेरळकरांच्या मागणीनंतर संगणकीय तिकीट आरक्षण केंद्र आणि पादचारी पुलाची घोषणा केली होती. त्यानंतर महिन्यातच आरक्षण केंद्र सुरु झाले आणि पादचारी पुलाचे काम काही महिन्यांनी सुरु झाले. मुंबई एन्डकडे नव्याने बांधकाम सुरु केलेल्या पादचारी पुलाचे दोन्ही बाजूचे पिलर २००४ च्या सुरु वातीला उभे राहिले. रेल्वेलाइनच्या मार्गिकेवर टाकण्याचे लोखंडी साहित्य देखील येऊन पडले होते. आजपर्यंत त्या पादचारी पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्याचे कारण रेल्वेकडून देताना ठेकेदार अर्धवट काम टाकून पळून गेल्याचे कारण दाखवण्यात येत आहे. त्यानंतर आजूबाजूच्या भिवपुरी रोड आणि शेलू या कमी गर्दीची स्थानके असलेल्या ठिकाणी पादचारी पुलाची उभारणी झाली होती. नेरळ स्थानकातील गर्दी आणि कर्जत एन्डकडे नवीन पादचारी पूल व्हावा, अशी मागणी प्रवासी संघटना आणि नेरळ ग्रामपंचायत करीत होती. (वार्ताहर)>कारवाईची मागणीदोन्ही फलाटावर नवीन पादचारी पुलाचे काम सुरु असून वर्षभरात पादचारी पूल तयार होईल, असे सांगितले जात आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने नवीन पादचारी पुलाबद्दल रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. मात्र अर्धवट अवस्थेतील पादचारी पुलास कारणीभूत ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी के लीआहे. ठेकेदारावर कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा करीत राहू अशी भूमिका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर, आदींसह पदाधिकारी राजेश गायकवाड, किसन शिंदे, आबा पवार, प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.