शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

नागेश्वरी नदीवरील पुलाची दुरवस्था

By admin | Updated: August 23, 2016 02:57 IST

महाड तालुक्यातील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पुलाची देखील दुरवस्था झाली आहे.

दासगाव : महाड तालुक्यातील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पुलाची देखील दुरवस्था झाली आहे. हा पूल ब्रिटीशकालीन नसला तरी पुलाची बिकटावस्था झाली आहे. पुलाच्या दुरूस्तीची मागणी अनेक वेळा करूनही न झाल्याने आता हा पूल नव्यानेच बांधण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.म्हाप्रळ -पंढरपूर मार्ग हा महाड तालुक्यातून जातो. महाडमधील खाडीपट्टा भागातील चिंभावे, तुडील, सव अशी गावे जोडत हा मार्ग महाडजवळ राजेवाडी गावालगत महाड भोर मार्गाला जोडला गेला आहे. म्हाप्रळ पंढरपूर राज्यमार्ग झाल्यापासून हा पूल अस्तित्वात आहे. दादली याठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलाच्या समकालीन हा पूल आहे. या पुलावरून रत्नगिरी जिल्हयातील गावांकडे जाणारी वाहने तसेच महाड आणि पुणे येथे जाणाऱ्या वाहनांबरोबरच महाडकडे येणारी छोटी वाहने मोठयाप्रमाणात ये-जा करीत असतात. पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळयात या पुलावरून कायम नागेश्वरी नदीचे पाणी जाते. यामुळे खाडीपट्टा विभागातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटतो.नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात पुलाचे कठडे देखील वाहून गेले आहेत. याठिकाणी कायम खाडीचे खारे पाणी असल्याने आणि या खाडीतून येणाऱ्या रसानमिश्रीत पाण्यामुळे पुलाच्या खांबांचे नुकसान झाले आहे. वरील सिमेंट निघून गेले असून आतिल लोखंडी सळया गंजून बाहेर आल्या आहेत. यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. म्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग कोकण आणि घाटाला जोडणारा मार्ग आहे. महाडच्या खाडी पट्टयातील ग्रामस्थ महाडमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर करतात. त्यामुळे या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. या परिसरात मोठया प्रमाणावर विट आणि वाळू वाहतूक होत असल्याने अवजड वाहनांचीही कायम वर्दळ असते. या पुलावरून पावसाळयात नदीच्या पुराने पाणी देखील जाते. यामुळे पावसाळयात या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प होते. दोन जिल्हयांना जोडणारा हा मार्ग कायम वर्दळीचा असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. या पुलाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायम प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. (वार्ताहर)>पुलाची उंची कमीम्हाप्रळ पंढरपूर हा मार्ग दोन जिल्हयांना जोडणारा राज्यमार्ग आहे. असे असून देखील या मार्गाकडे आणि रावढळ येथील पुलाकडे संबंधित विभाग कायम दुर्लक्ष करीत आले आहे. या पुलाची उंची कमी असल्याने ऐन पावसाळयात खाडीपट्टयातील लोकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत आता दुरूस्ती नको तर पुल नवीन बांधला गेला पाहिजे, असे रिपाइ तालुका सरचिटणीस लक्ष्मण जाधव यांनी सांगितले.