शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लग्न मोडल्याने वधूपित्याची आत्महत्या

By admin | Updated: March 3, 2015 01:13 IST

विवाह ठरल्यानंतर मुलाकडील मंडळींनी आणखी जादा हुंडा व मोटारीची मागणी करीत लग्न मोडल्यामुळे आलेल्या नैराश्येतून वाकसई गावात वधूपित्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोणावळा : विवाह ठरल्यानंतर मुलाकडील मंडळींनी आणखी जादा हुंडा व मोटारीची मागणी करीत लग्न मोडल्यामुळे आलेल्या नैराश्येतून वाकसई गावात वधूपित्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबूराव राघू येवले (वय ४८, रा़ वाकसई, ता़ मावळ) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला.याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नवरदेव बाळू भागू लालगुडे (रा़ नायगाव, ता़ मावळ) याला अटक केली आहे. तसेच त्याच्यासह इतर चौघांविरुद्ध फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. बाबूराव यांचा शेतीवर उदरनिर्वाह आहे. त्यांच्या मुलीचा विवाह नायगाव येथील भागू लालगुडे यांच्या मुलाशी ठरला होता़ २९ जानेवारीला वाकसई येथे कुंकुम तिलकाचा कार्यक्रम झाला होता़ विवाहाची तारीख १३ एप्रिल ठरली होती़ यानुसार नायगाव येथील एक मंगल कार्यालयही बूक केले होते़ अतिशय आनंदात विवाह सोहळ्याची तयारी सुरू असताना २० फेब्रुवारीला नवरदेवाने येवले यांना फोन करून ‘मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे नाही’, असे सांगत फोन बंद केला़ यानंतर येवले यांनी त्याला अनेकवेळा फोन केला; पण तो उचलत नव्हता़ यामुळे आपली फसवणूक झाली असून मुलाकडील मंडळी हुंड्यासाठी पिळवणूक करीत असल्याची तक्रार रविवारी (दि. १) बाबूराव यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती़ या सर्व प्रकारामधून नैराश्य येऊन बाबूराव यांनी सोमवारी सकाळी घराजवळच शेतावर गुरांच्या पडवीला गळफास घेऊन आत्महत्या केली़या घटनेनंतर संतप्त झालेल्या वाकसई ग्रामस्थांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत शवविच्छेदनानंतर मृतदेह ग्रामीण पोलीस स्टेशनला आणला़ ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी नवरामुलगा बाळू लालगुडे याला अटक करीत समोर आणल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला़ (वार्ताहर)४वर पक्षाकडून लग्न मोडल्याचा फोन आल्याने बाबूराव आणि त्यांचे कुटुंब सैरभैर झाले. ज्या प्रतिष्ठित मंडळीनी हा विवाह जुळवून आणला होता, त्यांना घेऊन नायगाव येथे मुलाच्या घरी जाऊन लग्न मोडू नका अशी विनवणी केली. यावेळी सुरुवातीला विवाह मोडला असाच मुद्दा लावून धरला. नंतर विवाह करायचा असेल तर ‘आम्हाला १० तोळे सोने व चारचाकी गाडी हुंडा म्हणून द्या, नाही तर लग्न मोडले, असे समजा’ असे सांगत हाकलून दिले़