शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर नगरसेविकेकडे घबाड

By admin | Updated: June 11, 2014 02:18 IST

अॅण्टी करप्शन ब्युरो (एसीबी)च्या पथकाने सोमवारी त्यांच्या बँक लॉकरमधून 1क् लाखांच्या रोकडसह सुमारे 94क् ग्रॅम सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आहेत.

राजू काळे - भाईंदर
भाजपा नगरसेविका व प्रभाग समिती कार्यालय क्र. 4 च्या माजी सभापती वर्षा भानुशाली यांच्या माया(वी) जालाचे एक एक किस्से समोर येत असून, अॅण्टी करप्शन ब्युरो (एसीबी)च्या पथकाने सोमवारी त्यांच्या बँक लॉकरमधून 1क् लाखांच्या रोकडसह सुमारे 94क् ग्रॅम सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आहेत. तसेच प्रतिज्ञापत्रत सव्वातीन लाख रुपये किंमत दर्शविलेल्या घरासाठी त्यांनी दीड कोटींचे गृहकर्ज घेतल्याचे उघडकीस आले आह़े
भानुशाली यांनी आपल्या प्रभाग क्र. 14 मधील दुकानदार राधा हर्षदराय पारेख (4क्, रा. भाईंदर पूर्व) यांच्याकडे दुकानाची उंची वाढविण्यासाठी 1 लाख 6क् हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी त्यांनी ठाण्याच्या एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने भानुशाली यांना 6 जून रोजी रात्री 7.5क् वाजताच्या सुमारास 5क् हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्यांच्याच घरात रंगेहाथ पकडले. यानंतर ठाणो न्यायालयाने त्यांना बुधवार्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांना धाडीत मात्र कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असले, तरी कारवाईवेळीच पथकातील एका वरिष्ठ अधिका:याच्या मार्गदर्शनानुसार भानुशाली यांनी सुमारे 2क् तोळे सोन्याच्या दागिन्यांसह काही लाख रुपयांची रोख रक्कम एका गाठोडय़ात बांधून इमारतीखाली फेकल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले आहे. परंतु या छप्पर फाडके गाठोडय़ाचा फायदा मात्र इमारतीमधीलच एका सुरक्षारक्षकाला झाला असून गाठोडे मिळाल्यापासून हा सुरक्षारक्षक गायब झाला आहे. परंतु ही केवळ अफवा असल्याचे सांगून हा खटय़ाळपणा असल्याचा दावा एसीबीने केला आहे. 
एसीबीच्या पथकाने सोमवारी भानुशाली यांचे खाते असलेल्या भाईंदर पूर्वेकडील जनसेवा सहकारी बँकेत दुपारी 3.3क् वाजताच्या सुमारास धडक दिली. त्यावेळी त्यांच्या लॉकरमधून तब्बल 1क् लाखांच्या  रोकडसह सुमारे 94क् ग्रॅम सोन्याचे दागिने ताब्यात घेऊन लॉकर सील केल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक साळवी यांनी सांगितले. याबाबत बँकेतील अधिकारी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. 
दरम्यान, भानुशाली यांच्या सुटकेसाठी सुरुवातीपासूनच भाजपा नेते विनोद तावडेंसह काही वरिष्ठ नेते सक्रिय झाले असून पालिकेतील आयुक्त (निवृत्त) शिवमूर्ती नाईक यांनी तर एसीबी कार्यालयात ठाण मांडल्याची माहिती सूत्रंनी दिली. 
 
च्2क्क्7 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेल्या भानुशाली यांनी भाजपात प्रवेश करून 2क्12 मधील निवडणुकीत भाजपाच्याच तिकिटावर विजय संपादन केला आहे. 
च्2क्क्7 ते 2क्12 दरम्यान त्यांनी वसईच्या कोल्ही गावात 13 गुंठे जमीन व जानकी हेरिटेजमध्ये आलिशान घर घेतले आहे. शिवाय रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांत कमालीची वाढ झाल्याचे कारवाईदरम्यान उजेडात आले आहे. 
 
च्त्यांनी निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रत जमिनीची किंमत 3 लाख रुपये तर घराची किंमत अवघी 3 लाख 2क् रुपये दाखविली आहे. 
च्परंतु घरासाठी मात्र त्यांनी वरील सहकारी बँकेतून तब्बल 1 कोटी 43 लाख 64 हजार 569 रुपयांचे गृहकर्ज घेतल्याचे नमूद केले आहे.