शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मयत ग्रामसेवकाच्या पत्नीला नवृत्ती वेतन नादेय प्रमाणपत्रासाठी मागितली लाच

By admin | Updated: September 5, 2014 01:45 IST

आकोट पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी व उपसरपंच गजाआड.

अकोला : मयत झालेल्या ग्रामसेवकाच्या कुटुंबाला नवृत्ती वेतन त्वरित लागू करण्यासाठी गरजेचे असलेल्या नादेय प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजार रु पयांची लाच उपसरपंच पदावर कार्यरत सहकार्‍यामार्फत स्वीकारणार्‍या आकोट पंचायत समितीमधील विस्तार अधिकार्‍याला गुरुवारी दुपारी २.३0 वाजता सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकोट पंचायत समितीमध्ये रामकृष्ण वानखडे हे ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. १८ जुलै २0१३ रोजी आकोट येथे त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांचे कुटुंब नवृत्ती वेतन, उपदान, अर्जित रजेचे रोखीकरण, गटविमा योजना, भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळण्यासाठी त्यांची पत्नी रेखा वानखडे (३५) यांनी संबंधित कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केला; परंतु त्यांना वर्षभर संबंधित कार्यालयाने प्रतिसादच दिला नसल्याने रेखा वानखडे यांनी जिल्हा परिषदेसमोर २४ मार्च २0१४ रोजी बेमुदत उ पोषणाचा इशारा दिला होता. जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्याची दखल घेत, त्यांना भविष्य निर्वाह निधी व उपदान ग्रॅच्युईटी दिली आणि कुटुंब नवृत्ती पेन्शन लागू करण्यासाठी आकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांना आदेश दिले. गटविकास अधिकार्‍यांनी रेखा वानखडे यांचा प्रस्ताव विस्तार अधिकारी सुधाकर संभाजी लोथे यांच्याकडे पाठविला; परंतु सुधाकर लोथे याने विधवा महिलेस नवृत्ती वेतन नादेय प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे रेखा वानखडे यांनी सुरुवातीला ३ हजार रुपये व नंतर दोन हजार देण्याची तयारी दाखविल्याने, विस्तार अधिकारी लोथे याने तीन हजार रुपये वडाळी येथील फिरोज नामक इसमास देण्याचे सांगितले. फिरोजने ३ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर उर्वरित दोन हजारांची लाच घेऊन ४ सप्टेंबर रोजी लोथे याने आकोट येथील क्वॉलिटी हॉटेल येथे बोलाविले. या ठिकाणी त्याने त्याचा सहकारी वडाळीचा उपसरपंच शोएबउद्दीन सैफुद्दीन याला पाठविले आणि त्याने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी शोएबउद्दीनला अटक केली. नंतर पोलिसांनी विस्तार अधिकारी सुधाकर लोथे यालाही गजाआड केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी केली.