शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाच देणा-या पन्हाळ्याच्या वकिलास अटक

By admin | Updated: October 6, 2016 20:31 IST

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जास न्यायालयात विरोध करू नये म्हणून फौजदारास चक्क १० हजारांची लाच देताना

ऑनलाइन लोकमत
 
कोल्हापूर, दि.06 -  अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जास न्यायालयात विरोध करू नये म्हणून फौजदारास चक्क १० हजारांची लाच देताना पन्हाळ्याच्या वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले. माणिक नामदेव डवंग (रा मंगळवार पेठ, पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. सध्या चंदगड पोलिस ठाण्यात फौजदार म्हणून नेमणुकीस असलेल्या दिलीप बाबूराव तिबिले यांनी त्यासंबंधीची तक्रार दिली. लाच घेताना रंगेहात पकडण्याच्या घटना रोजच घडत आहेत; परंतु लाच देताना अटक होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे या विभागातून सांगण्यात आले.
 
घडले ते असे :
चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४४/२०१६ अन्वये अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा गुन्हा (भांदविसं कलम ३६३, ३६६ व बाल लैंगिक कायदा - पोस्को कलम ४) नोंद आहे. त्यामध्ये पाच संशयित आरोपी आहेत. त्यांपैकी सागर चंद्रकांत मिरजे (रा. बुधवार पेठ, पन्हाळा) यास अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे वकीलपत्र माणिक डवंग यांनी घेतले आहे. ज्या चार आरोपींना अद्याप अटक झालेली नाही, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज डवंग हे गडहिंग्लज न्यायालयात दाखल करणार आहेत. त्या अर्जास न्यायालयात विरोध करू नये म्हणून अ‍ॅड. डवंग यांनी फौजदार तिबिले यांना ५० हजार रुपयांची लाच देऊ केली; परंतु तिबिले यांना ती लाच रक्कम स्वीकारावयाची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि. ५) तक्रार केली.
शासकीय लोकसेवकास लाच देणे हा गुन्हा होतो; त्यामुळे गुरुवारी पन्हाळा येथे दोन पंचांच्या समक्ष अ‍ॅड. डवंग यांच्याविरुद्ध सापळा रचण्यात आला. डवंग यांनी तक्रारदार दिलीप तिबिले यांना पन्हाळा एस.टी. स्टॅँड येथे बोलावले. तेथील हॉटेल शिवराजसमोर तक्रारदार यांच्या गाडीमध्ये १० हजार रुपयांची लाच देऊन उर्वरित रक्कम नंतर देतो असे सांगत असतानाच त्यांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उदय आफळे, सहायक फौजदार मनोहर खणगावकर, हवालदार श्रीधर सावंत, मोहन सौंदत्ती, दयानंद कडूकर, सर्जेराव पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला. फौजदार तिबिले हे मुळचे शिंदेवाडीचे असून त्यांनी यापूर्वी करवीर व पन्हाळा पोलिस ठाण्यातही काम केले आहे.
 
लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, असा फलक सर्वच शासकीय कार्यालयांत लावलेला दिसतो; परंतु लाच घेताना अटकेची कारवाई ही आता सर्रास होत आहे. राज्यात रोज कुठे ना कुठे दोन तरी सरकारी कर्मचारी व अधिकारी लाच घेताना पकडले जात आहेत; परंतु लाच देणाºयास अटक होण्याची कारवाई तशी दुर्मीळ आहे. राज्यभरात आतापर्यंत अशा सुमारे दहा कारवाया झाल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
असे आहे मूळ प्रकरण..
पन्हाळ््यातील एका तरुणाचे कोवाड हे आजोळ. त्यामुळे तो नेहमी कोवाडला जात असे. त्यातून तेथील एका अल्पवयीन मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. तो कॉलेजला जातो असे सांगून २६ सप्टेंबर २०१६ ला त्या मुलीसह पळून गेला. म्हणून मुलीच्या वडिलांनी संबंधित तरुण, त्याचे आईवडिल व बहिण-भाऊ अशा पाच जणांविरुध्द तक्रार दिली. त्यातील तरुणास पन्हाळा पोलिसांनी अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.